आरोग्य

उरलेली डाळ ‘या’ पद्धतीन खा, प्रोटीन मिळेल भरपूर

हाडं आणि शरीराच्या चांगल्या कार्यासाठी शरीराला इतर पोषक घटकांप्रमाणेच प्रोटीन्सची आवश्यकता असते. प्रोटीन्सची कमतरता भासल्यास स्नायू दुखणं, शरीरातील अतिरिक्त फॅट वाढणं किंवा वजन कमी होणं, मसल्सचा अभाव, अशक्तपणा, थकवा येणं असे त्रास उद्भवू शकतात. मांसाहारी अन्नातून भरपूर प्रोटीन मिळतं, शाकाहारी पदार्थांमध्ये प्रोटीन्सची कमतरता असते असा अनेकांचा समज असतो.

असं नसून रोजच्या आहारातले काही शाकाहारी पदार्थ खाऊन तुम्ही प्रोटीन्सची कमतरता भरून काढू शकता. जसं की डाळी प्रत्येकाच्याच घरी असतात. डाळींचा आहारात समावेश केल्यास पोषक तत्वांची कमतरता भरून निघण्यास मदत होईल. शिल्लक राहिलेल्या वरणाचा वापर करून तुम्ही उत्तम पदार्थ बनवू शकता. डाळीत प्रोटीन्सबरोबरच व्हिटामीन्स आणि फायबर्स असतात. मूग डाळ खाल्ल्यानं शरीर बळकट राहते.

डाळीचे सूप

उरलेल्या डाळीत भाज्या, मसाले आणि पाणी घालून सूप तयार करू शकता. ज्यामुळे शरीर हायड्रेट राहील आणि शरीराला फायबर्स मिळण्यासही मदत होईल.

डाळीचा पराठा

उरलेली डाळ गव्हाच्या पिठात घालून घट्ट कणिक मळून तुम्ही पराठा बनवू शकता. हा हेल्दी प्रोटीन रिच पराठा खाल्ल्यानं तुम्हाला बराचवेळ भूक लागणार नाही.

डाळ चिला

वाटलेल्या डाळीत ओट्स बेसन मिसळून मिश्रण तयार करा आणि तव्यावर डोसा बनवून घ्या. हा प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. जर तुम्हाला किंवा घरातील लहान मुलांना डाळ खाण्याचा कंटाळा येत असेल तर हा उत्तम पर्याय आहे,

डाळ पुलाव

डाळीसोबत तांदूळ आणि भाज्या मिसळून तुम्ही डाळ पुलाव बनवू शकता. डाळ पुलाव खाल्ल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतील. हा एक हलका आहार आहे. या पुलावचे सेवन केल्यानं एनर्जी मिळेल, शरीरही निरोगी राहील.

डाळ खिचडी

उरलेल्या डाळीत शिजवलेले तांदूळ घालून तुम्ही डाळ खिचडी बनवू शकता. डाळ खिचडी हा पौष्टीक हलका आहार असून पचायलाही हलका आहे. डाळ खिचडीचा आहारात समावेश करून तुम्ही पोषक तत्वांची कमतरता भरून काढू शकता.

 

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

12 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

13 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

13 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

13 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

13 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

13 तास ago