आरोग्य

‘ड’ जीवनसत्त्वाची कशी करावी पुर्तता…

चेहरा, हात-पाय यांच्यावरती (उघाड्या अंगावर) पंधरा मिनिटे, आठवड्यातून कमीत कमी २ वेळा भरपूर सूर्यप्रकाश पडला तरी पुरेसे व्हिटॅमिन ‘डी’ बनू शकते. तुम्हाला सारखेच गळून गेल्यासारखे वाटत असेल, दमल्यासारखे वाटत असेल, ऊठसूट कंबर, पाठ दुखत असेल, सारखेच आजारी पडत असाल किंवा कायम आजारीच असल्यासारखे वाटत राहत असेल, जखम बरी होत नसेल पायात किंवा इतरत्र पेटके येत असतील, स्नायू दुखत राहत असतील, दात ठिसूळ झाले असतील किंवा तुमचा चिडचिडेपणा वाढला असेल, पटकन तुम्ही नैराश्याची शिकार होत असाल किंवा रिपोर्टमध्ये कॅल्शियम कमी झाल्यासारखे दिसत असेल, तर तुम्ही नक्कीच खात्री करून घेतली पाहिजे की तुमच्या शरीरातील ‘ड’ जीवनसत्त्व कमी तर नाही ना झाले? लहान मुलांच्या बाबतीत याशिवाय दोन तक्रारींनी ‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव असावा असे संकेत मिळतात. जसे की – हवे तेवढे वजन न वाढणे किंवा वाढीचे टप्पे गाठण्यात अडथळा येणे.

‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव का येतो याचा विचार केला तर काही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. ‘ड’ जीवनसत्त्व हे निसर्गतः कातडीखाली सूर्यकिरणांतील अल्ट्रावॉयलेट किरणांमधल्या बी बँडमुळे तयार होत असते, यामुळेच याला ‘सनशाइन व्हिटामिन’ असेही म्हटले जाते. याला कोलेकॅलसीफेरॅाल (D3) असे म्हणतात. कातडीमध्ये जीवनसत्त्व बनण्याच्या प्रक्रियेतही वय, कातडीचा रंग, कातडीच्या एकूण किती भागावर सूर्यकिरण पडत आहेत, कोणत्या वेळी हा सूर्यप्रकाश अंगावर पडतो, नक्की कुठे राहता, ऋतू, वेळ, सावली पडते का, हवेत प्रदूषण आहे का यावर अवलंबून असते. वय वाढते तसा ‘ड’ जीवनसत्त्व बनण्याचा वेग कमी होतो. कातडी काळी असेल तर ‘ड’ जीवनसत्त्व बनण्यासाठी जास्त सूर्यप्रकाश लागतो. कोवळे ऊन घेण्यापेक्षा सूर्य डोक्यावर असताना ‘ड’ जीवनसत्व बनण्याची प्रक्रिया तिच्या शिखरावर असते.

थोडक्यात तुमच्या खऱ्या उंचीपेक्षा तुमची सावली जर उंच असेल तर तुम्ही विटामिन डी बनवू शकत नाही! चांगली वेळ मध्यान्हीची, ती सोसत नसेल तर त्याच्या अलीकडे पलीकडे एक दीड तास ! कोलेकॅलसीफेरॅाल वरती लिव्हर आणि किडनीमध्ये प्रक्रिया होऊन कॅलसिट्रॅाल तयार होते त्यामुळे किडनीज नीट काम करत नसतील तर किंवा किडनी आणि लिव्हरच्या जुनाट आजारामध्ये ‘ड’ जीवनसत्त्व कमी प्रमाणात तयार होते. बाळ बरेच दिवस आईच्या अंगावर पीत असेल किंवा खूप अपुरे अन्न बाळाला मिळत असेल तरी देखील ‘ड’ जीवनसत्त्व कमी पडते. गॅस्ट्रिक बायपास सर्जरी, सिस्टिक फायब्रोसिस , क्रॅान्स्डिसीज, सिलियाक डिसीज यासारख्या आजारांमध्ये अन्नात असलेले ‘ड’ जीवनसत्त्व शोषून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये गुंतागुत झाल्यास ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता भासते. दम्या सारख्या वा इतर काही आजारांमध्ये स्टिरॉइड्स जास्त प्रमाणामध्ये वापरली गेली किंवा फीटसाठी वापरल्या जाणाऱ्या काही औषधांमुळे, तसेच काही विषाणूविरोधी औषधांमुळे ‘ड’ जीवनसत्त्वाची पातळी शरीरामध्ये कमी होते.

‘ड’ जीवनसत्त्व सुदैवाने निसर्गामध्ये सूर्यप्रकाशामुळे भरपूर उपलब्ध असले तरीदेखील ते सहजासहजी कोणकोणत्या अन्नातून मिळू शकेल याचा विचार करणे यामध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची रेलचेल असते. ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता भासू नये यासाठी काही अन्नपदार्थामध्ये जाणीवपूर्वक ‘ड’ जीवनसत्त्व मिसळलेले असते. उदाहरणार्थ काही तृणधान्ये व कडधान्ये, नैसर्गिक मश्रूम (अळंबी) मध्येही भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळते. ‘ड’ जीवनसत्त्व हे तेलात विरघळणारे असल्यामुळे ते अन्नाबरोबर किंवा अन्नानंतर घेतले तर त्याचे शोषण चांगले व पटकन होते.

‘ड’ जीवनसत्त्व नक्की करते तरी काय…?
पॅराथायरॉइड नावाचा हार्मोन हाडाची एकसंधता तोडण्याचे काम करत असतो. या हार्मोनला प्रतिबंध झाल्यास हाडांचे आरोग्य वाढते. ‘ड’ जीवनसत्त्वाचा या क्रियेमध्ये फार मोठा हातभार असतो. ऑस्टियोब्लास्ट (हाडे बांधणाऱ्या पेशी) आणि ऑस्टियोक्लास्ट (हाडे शोषणाऱ्या पेशी) या दोन्हींच्या योग्य कामासाठी, त्यांच्यामध्ये समन्वय राखण्यासाठी ‘ड’ जीवनसत्त्वाची आवश्यकता असते. असे झाले तरच हाडांचे आरोग्य व्यवस्थित राहते आणि हाडे बळकट बनतात. कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम हे शरीरातील सर्व रासायनिक क्रियांसाठी आवश्यक घटक असतात यांचे शोषण ‘ड’ जीवनसत्त्वाशिवाय होऊ शकत नाही. शरीरातील प्रत्येक पेशीची वाढ ते तिचा मृत्यू या प्रवासासाठी ‘ड’ जीवनसत्त्वाची आवश्यकता असते. आयुर्मर्यादा वाढविणे, प्रतिकार शक्ती वाढवणे, चिंता आणि नैराश्य कमी करणे यामध्येही ‘ड’ जीवनसत्त्वाची महत्त्वाची कामगिरी असते. कातडीचे संरक्षण, कातडीचे वार्धक्य कमी करणे आणि कातडीचा कायाकल्प यामध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाचा मोठा सहभाग असतो.

‘ड’ जीवनसत्त्व गंभीर स्वरुपात कमी झाल्यास कॅल्शियम, फॉस्पेट्स कमी होतात, वाढीचे वय असलेल्या लहान मुलांमध्ये रिकेट्स ( मुडदूस) होतो ज्यामध्ये हाडे अधू , मऊ होतात. प्रौढांमध्ये ऑस्टिओमलेशिया (हाडे मऊ होण्याची प्रक्रिया झाल्याने) हाडांची घनता कमी होते, अस्थिभंगाची शक्यता वाढते. ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावाने मोठा आजार होण्याआधीच प्रथमदर्शनी तक्रारही नाहीत किंवा कोणतीही लक्षणे नाहीत अशी परिस्थितीच जास्त करुन दिसून येते. यामध्ये आतड्यातून शरीरातील कॅल्शियमच्या शोषणाचे प्रमाण कमी झाल्याने हाडांची घनता कमी होते, हाडे पातळ करणाऱ्या पॅराथायरॉइड हार्मोन ची शरीरातील पातळी वाढते आणि छोट्याश्या पडझडीमुळे देखील अस्थिभंग होऊ शकतो.

‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता शरीरामध्ये झाली आहे हे शोधून काढण्यासाठी रक्तामधील ‘ड’ जीवनसत्त्वाची पातळी मोजता येते. कमतरता असल्यास तातडीने औषधयोजना आवश्यक असते. औषधोपचार करताना ‘ड’ जीवनसत्त्वाचा चुकून जास्त डोस दिला गेला तर कॅल्शियम शरीरामध्ये साठून राहते. त्याचा परिणाम म्हणून खूप तहान लागणे, भूक मंदावणे, हाडे दुखणे, शौचाला खडा होणे, अशक्तपणा वाढणे, मळमळ होणे, बोलताना शब्द बोबडे येणे, पोटात कळा येणे, अंग दुखणे, तोल जाणे सारख्या तक्रारी येतात.

(सोशल मीडियावरुन साभार)

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दानशूरतेतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख; युवा उद्योजक अमोल पुंडे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली

पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…

1 तास ago

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

20 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

20 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

20 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

21 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

1 दिवस ago