आरोग्य

ऑयली त्वचासाठी उपाय कसा करावा

1) बेसन, तांदळाचे पीठ, दही आणि हळद मिक्स करून लेप बनवून लावल्यामुळे स्कीन चे ऑईली पण समाप्त होते आणि चेहऱ्यावर चमक येते. हा उपाय face वरून काळे दाग आणि पिंपल्स दूर करण्यासाठी देखील फायदेशीर होतो.

2) मध, पुदिना रस आणि लिंबू रस यांचा देखील oily skin पासून सुटका मिळवण्यासाठी वापर केला जाऊ शकतो.

3) हळद, मुलतानी माती आणि चंदन यांचा लेप चेहऱ्यातील मॉश्चराइज ओढून घेतो आणि स्कीन ऑईल फ्री होते. या घरगुती उपाया मुळे स्कीन टाईट होते. यामुळे तुम्ही नेहमी फ्रेश दिसाल. हा लेप लावल्यावर 30 मिनिटांनी चेहरा धुवावा.

4) चेहऱ्यावर कच्चा बटाटा किंवा काकडी चोळल्यामुळे देखील फायदा होतो.

चेहरा गोरा आणि सुंदर कसे बनवायचे

1) एलो वीरा ज्यूस, एप्पल साइडर विनिगर आणि हळद, या तीन वस्तू मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा सावळे पण दूर होतो.

2) गोरा रंग मिळवण्यासाठी हळद आणि लिंबूरस वापरणे उत्तम आहे. हा उपाय तेलकट त्वचेच्या लोकांसाठी उत्तम आहे.

3) दुधा ची मलाई, बेसन आणि हळद मिक्स करून एक लेप बनवा. हा लेप चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. ऑईल स्कीन वाल्यांनी हा उपाय करू नये. ड्राय स्कीन वाले करू शकतात.

4) मध, गुलाबाच्या पाकळ्या आणि दुध यांचा लेप रंग उजळण्या साठी आणि चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी वापरा.

5)बाहेरून आल्यावर त्वरित चेहरा स्वच्छ धुवावा कारण त्वचेच्या रोम छिद्रात मळ जमा होऊ शकतो.

6) पपई चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी फायदेशीर आहे. कच्ची पपई dead skin cells दूर करण्यासाठी उपयोगी आहे.

तुळशीची पाने बारीक वाटून याचा लेप चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहरा टवटवीत होतो.

अननस आणि पिकलेले टोमाटो चेहऱ्यावर face pack बनवून लावल्याने हळूहळू गोरे पण येईल.

वाफ घेतल्याने छिद्रात साठलेले तेल, माती आणि डेड स्कीन सेल्स सहज निघून जातात. हा skin care चा सर्वात उत्तम आणि सोप्पा उपाय आहे.

दही, आवळा पावडर, हळद आणि बेसन मिक्स करून एलोवीरा ज्यूस आणि थोडा लिंबूरस मिक्स करून फेशियल पैक तयार करा. यास चेहऱ्यावर लावा. या उपायाने काळे दाग दूर होतील आणि skin moisturize होईल.

शरीराची बाहेरील सुंदरता वाढवण्यासाठी आवश्यक आहे कि तुम्ही शरीराच्या आतून देखील निरोगी असले पाहिजे. वर सांगितलेले ब्युटी चे घरगुती उपाय करण्या सोबतच आवश्यक आहे तुम्ही हे उपाय देखील केले पाहिजेत.

पौष्टिक भोजन खावे ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळतील आणि त्वचा निरोगी राहील. यासाठी तळलेले, मसालेदार, फास्ट फूड खाण्याच्या एवजी विटामिन आणि मिनरल्स असलेले पदार्थ आहारात घ्यावेत.

पोटाच्या आजारा पासून स्वताला वाचवा. सकाळी पोट सोफ्ट करण्यासाठी गरम पाण्यात थोडासा लिंबूरस, मध आणि अद्रक रस मिक्स करून प्यावे.

रोज 3 ते 4 लीटर पाणी प्यावे ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघून जातील.

वेळेवर भोजन करावे.

रोज व्यायाम करावा.

तणाव मुक्त राहावे आणि चांगली झोप घ्यावी.

खाण्यापिण्याच्या वाईट सवयी पासून वाचावे.

जर तुम्ही पिंपल्स ने हैराण आहे तर कांदा आणि लसून यांची पेस्ट बनवून यामध्ये कडूलिंबाची पाने मिक्स करून पेस्ट बनवा. आता हे मिश्रण थोडी हळद मिक्स करून फेस वर लावा. याच्या व्यतिरिक्त तुम्ही वाफ घेऊ शकता ज्यामुळे pimples दूर होतील.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

4 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

4 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

4 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

4 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

4 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

4 तास ago