आरोग्य

दातांची काळजी कशी घ्यावी…

१) दात सुंदर, पांढरेशुभ्र असतील तर व्यक्तीचा चेहरा मोहक वाटतो. पण दाताकडे लक्ष दिले नाही तर कोरीव ओठ व इतर मेकअप फिका वाटतो. म्हणूनच दात चमकदार, पांढरेशुभ्र ठेवले पाहिजेत.

२) छान चवीचे पदार्थ खायला सर्वांनाच खूप आवडतात, पण नंतर चूळ भरणे, माऊथवॉशने गुळण्या करणे, दिवसा व रात्री ब्रश करणे या साध्या व सोप्या गोष्टी करण्याचा आळस येतो. काही छोटया गोष्टींची काळजी घेतली तर दात मजबूत, बळकट व चमकदार होतात.

३) ब्रश दर ३ महिन्यांनी बदलावा. दंतवैद्याने सुचवलेला ब्रश वापरावा.

४) हिरड्यांवरुन हलक्या हाताने पेस्ट चोळून मसाज करावा. रक्ताभिसरण सुधारून दातावरील कीटक साफ होतात.

५) श्वास दुर्गंधी किंवा मूखदुर्गंधी पचन क्रिया व्यवस्थित होत नसल्यामुळे सुरु होते. सारखा लवंग किंवा वेलची तोंडात धरण्याऐवजी दंतवैद्याकडे जाऊन उपचार करावे.

६) दात किडणे, पडणे या गोष्टींसाठी घरगुती उपचार करू नये.

७) फळे, सलाड दातांना बळकटी देतात. सफरचंद जेवणानंतर खाल्लं तर ब्रशप्रमाणे काम करत. पौष्टिक घटक, लाळ जास्त सुटून दातांना लाभदायक करणे, आम्ल निर्जंतुकपणाचं काम करणे इ. साठी सफरचंद रोज खावं. द्राक्षामुळे दात किडत नाहीत उलट हिरड्या व दात मजबूत होतात.

८) पालक आणि गाजराचा रस पायरीया बरा करतो.

९) आहारात कोंड्यासकट पोळी, भाकरी, भाज्या, फळे, दुध, दही घ्यावे.

१०) काही जरी खाल्ले तरी चूळ भरण्याची सवय लावून घ्यावी.

११) मेकअप करण्याच्या आधी दात स्वच्छ घासावेत.

१२) वर्ष-सहा महिन्यांनी दंतवैद्याकडे जाऊन दात स्वच्छ करून घ्यावे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

9 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago