मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी स्वाती पाचुंदकर यांची बिनविरोध निवड

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे) पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकांपैकी महत्वाचं देवस्थान असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी स्वाती दत्तात्रय पाचुंदकर यांची बिनविरोध निवड झाली असुन रांजणगाव गणपती देवस्थानच्या इतिहासात सन 1941 नंतर प्रथमच स्वाती पाचुंदकर यांची महिला अध्यक्ष म्हणुन पहिल्यांदाच निवड झाली असुन देवस्थानच्या इतर चार सहकाऱ्यांनी पुढील पाच वर्षांसाठी स्वाती पाचुंदकर यांनाच बिनविरोध अध्यक्ष म्हणुन नियुक्त केले असल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पुणे येथील दिवाणी न्यायालयाने या निवडप्रकियेचा कार्यक्रम मुलाखतीनंतर जाहीर केला. पाच वर्षे कार्यकाळ असलेल्या या ट्रस्टींच्या 5 जागेकरिता सुमारे ३६७ पेक्षा जास्त इच्छुकांनी अर्ज केले होते. त्यामधून नूतन विश्वस्त मंडळाची नेमणूक करण्यात आली. या पाच विश्वस्तांमध्ये देव घराण्यातील दोन विश्वस्त म्हणून ओमकार नितीन देव व विजय काशिनाथ देव तर स्थानिक ग्रामस्थ मधून तुषार बाळासाहेब पाचुंदकर आणि स्वाती दत्तात्रय पाचुंदकर पाटील आणि पुणे जिल्ह्यातील एक विश्वस्त म्हणून कन्हेरसर (ता. खेड) येथील रहिवासी संदीप तुकाराम दौंडकर यांची विश्वस्त म्हणून निवड करण्यात आली होती.

12 जानेवारी रोजी श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या पाच विश्वस्तांची निवड झाल्यानंतर पदाधिकारी निवडीसाठी गुरुवार (दि 19 )विश्वस्त मंडळाची पहिली बैठक झाली. या बैठकीत मुख्य विश्वस्तपदी ओंकार नितीन देव यांची तर अध्यक्षपदी स्वाती पाचुंदकर यांची पाच वर्षांसाठी निवड करण्यात आली.उपाध्यक्षपदी संदीप दौंडकर, सचिवपदी तुषार पाचुंदकर आणि खजिनदारपदी विजय देव यांची निवड करण्यात आली. या सर्वच निवडी बिनविरोध पार पडल्या. या निवडीनंतर नूतन अध्यक्ष, मुख्य विश्वस्त व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते महागणपती मंदिरात आरती करण्यात आली. तसेच ग्रामस्थांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

आजोबांनंतर नातू तरुणपणीच मुख्य विश्वस्त… 

या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये ओंकार नितीन देव यांना तरुणपणीचं वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षीचं मुख्य विश्वस्त म्हणुन श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट मध्ये संधी मिळाली असुन ओंकार यांचे आजोबा वसंतराव मोरेश्वर देव हे सुद्धा रांजणगाव देवस्थान मध्ये मुख्य विश्वस्त होते. त्यांच्या नंतर चाळीस वर्षांनी ओंकार यांची देवस्थान मध्ये निवड झाली आहे.

रांजणगावच्या सरपंच ते देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा…

श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या स्वाती पाचुंदकर या रांजणगाव गणपती गावच्या आदर्श सरपंच, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य तसेच जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्य म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला असुन रांजणगाव – कारेगाव जिल्हा परिषद गटात त्यांनी महिलांचे मोठे संघटन केले आहे. त्यांना अध्यक्षपदी संधी मिळाल्यानंतर महिलांनीही मोठया प्रमाणात जल्लोष केला आहे.

रांजणगाव गणपती हे अष्टविनायकापैकी एक महत्वाचे देवस्थान असल्यामुळे या ठिकाणी भाविकांची नेहमीच वर्दळ असते. या पुढील काळात भाविकांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित आहे. तसेच सामाजिक दायित्व म्हणून विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, या तीर्थक्षेत्राचा विकास करताना भाविकांना अधिकाधिक सोयीसुविधा देण्याला आमचे प्राधान्य राहिल. असे श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या नवनियुक्त अध्यक्षा स्वाती पाचुंदकर यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

10 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago