आरोग्य

शरीरात हे ५ संकेत दिसणं म्हणजे नक्कीच काहीतरी तंत्र बिघडलंय, दुर्लक्ष कराल तर होईल मोठं नुकसान

तब्येत चांगली ठेवण्यासाठी आणि वेगवेगळे आजार टाळण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. पौष्टिक आहार घेतात आणि नियमितपणे व्यायाम करतात. पण अनेकदा आपलं शरीर आपल्या काय सांगू पाहत आहे, त्याकडे लक्षच दिलं जात नाही. जास्तीत जास्त लोक शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे पुढे जाऊन गंभीर समस्या होतात.

असं म्हणायला जर विचित्र वाटू शकतं. पण आपलं शरीर काही संकेतांच्या माध्यमातून आपल्यासोबत काहीतरी बोलत असतं. शरीर सांगत असतं की, तुम्ही आता आराम करायला हवा आणि कधी त्याला पोषणाची गरज आहे. जर हे संकेत ओळखणं तुम्ही शिकलात, तर अनेक आजारांचा धोका टाळून एक हेल्दी जीवन जगू शकता.

ब्रेन फॉग

तुम्हाला जर गोष्टी लक्षात ठेवण्यास समस्या होत असेल, लक्ष केंद्रीत करता येत नसेल आणि कामावर फोकस करू शकत नसाल तर याला ‘ब्रेन फॉग’ म्हणतात. या समस्या खराब झोप, ब्लड शुगर असंतुलन आणि स्ट्रेस हार्मोन कार्टिसोल वाढल्याचं कारण असू शकतात.

काय कराल उपाय?

सकाळी उन्हात बसा. आपल्या आहारात प्रोटीन आणि हेल्दी फॅटचा समावेश करा. रात्री झोपण्याआधी मोबाइल आणि लॅपटॉप बघणं टाळा.

८ तास झोपूनही थकवा

जर तुम्ही रात्री ८ वाजता पुरेशी झोप घेतल्यावरही सकाळी जर थकवा जाणवत असेल, तर ही बाब सामान्य नाही. याचा हा अर्थ होतो की, तुमचं शरीर योग्यपणे रिकव्हर होत नाहीये. रात्री कार्टिसोल लेव्हल वाढल्यानं आणि मेलाटोनिन कमी झाल्यानं झोपेत अडथळा निर्माण होतो.

काय कराल उपाय

रात्री झोपतेवेळी घरातील लाइट डिम करा. झोपायच्या २ तासआधी जेवण करा. मोबाइल-टिव्ही बघू नका.

सकाळी भूक न लागणे

जर तुम्हाला सकाळी झोपेतून उठल्यावर भूक लागत नसेल तर हा एक संकेत आहे की, नर्व्हस सिस्टीम स्ट्रेसमध्ये आहे. वाढलेल्या कार्टिसोलमुळे भूक कमी लागते.

काय कराल उपाय?

सकाळी नियमितपणे हलका व्यायाम करा. नाश्ता करण्याआधी कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्या.

हात-पाय थंड पडणे

जर तुमचे हात आणि पाय नेहमीच थंड राहत असतील, तर हा थायरॉइड हार्मोनचं कमी उत्पादन आणि मेटाबॉलिज्म स्लो झाल्याचा संकेत असू शकतो.

काय कराल उपाय

नेहमीच पौष्टिक आहार घ्या. जेवण स्किप करू नका. आहारात आयोडिन, सेलेनिअम आणि झिंकसारखे पोषक तत्व असायला हवेत. यांनी थायरॉइडच्या फंक्शनला सपोर्ट मिळेल.

मूडमध्ये सतत बदल

जर तुम्हाला नेहमीच निराश वाटत असेल किंवा कोणत्याही कामात लक्ष लागत नसेल तर याला तुमचे मिनरल्स, सकाळचं रूटीन जबाबदार असतं.

काय कराल उपाय

रोज हलका व्यायाम करा. मॅग्नेशिअमचा आहारात समावेश करा. उन्हात बसा आणि लोकांना भेटा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणातील वाळूमाफियांचे इंस्टाग्राम स्टेटसद्वारे प्रशासनाला खुले आव्हान; पुणे जिल्हाधिकाऱ्यांसह शिरूरच्या यंत्रणेचे नेमके चाललेय तरी काय?

शिरूर (तेजस फडके) : शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जीवनदायिनी ठरलेल्या घोड धरणातील वाळू उपशाचा…

8 तास ago

शिरुर तालुक्यात किरकोळ कारणांवरुन मारहाणीच्या दोन वेगवेगळ्या घटना; १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात किरकोळ कारणांवरुन झालेल्या वादाचे रुपांतर थेट मारहाणीत होत असल्याच्या दोन…

11 तास ago

शिक्रापूर पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी झाली दूर…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : दिवाळी म्हटले की खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी आणि नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक…

6 दिवस ago

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

1 आठवडा ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

1 आठवडा ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

1 आठवडा ago