आरोग्य

झोप येत नसेल तर मग हा एक पदार्थ खा लगेच झोप लागेल

हल्ली जीवनशैली बदलल्याने आपल्या जीवनाच्या अनेक गोष्टीही बदलल्या आहेत. आपण आपला आहार वेळेवर घेत नाही. व्यायाम, योगा आणि मेडिटेशनपासून दूर राहतो. त्यामुळे मग शरीर स्थुल बनतं. कमी वयात म्हातारपण येतं आणि आजारपण मागे लागल्याने औषधांची जंत्री घेऊनच फिरावं लागतं. काही लोकांना तर खराब जीवनशैलीमुळे रात्रीची झोपही चांगली येत नाही. कामाचा ताण, मानसिक दबाव किंवा मोबाईल, लॅपटॉपचा वापर यामुळे अनेक वेळा झोपेचं त्रांगडं होतं.

तुमच्या घरात सहज उपलब्ध असलेला एक साधा पदार्थ तुमच्यासाठी औषधी काम करू शकतो. हा पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला गाढ आणि शांत झोप लागेल. अनेक लोक रात्री जेवणानंतर काही गोड खायची इच्छा व्यक्त करतात, तर काही लोक दूध पितात किंवा सुंठ खातात. याशिवाय, जेवणानंतर चहा पिण्याची सवय लावली पाहिजे. तज्ज्ञांच्या मते, रात्री जेवणानंतर चहा प्यायल्यास शांत आणि गाढ झोप मिळवण्यास मदत होऊ शकते. चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत.

काय आहेत फायदे

चांगली झोप: रात्री जेवणानंतर चहा प्यायल्यामुळे गॅस आणि अ‍ॅसिडिटीच्या समस्या होत नाहीत. काही लोक रात्री जेवणानंतर गॅस आणि अ‍ॅसिडिटीमुळे अस्वस्थ होतात. अशा परिस्थितीत जर चहा घेतला, तर त्यांना आराम मिळतो. चहा प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते. कारण तो गॅस्ट्रिक एंझाइम उत्पादनाला उत्तेजन देतो. त्याशिवाय, चहामध्ये असलेला बिटनिन झोपेसाठी आवश्यक हार्मोनच्या निर्मितीला मदत करतो, ज्यामुळे चांगली झोप लागते.

मानसिक ताण कमी होतो: अनेक लोक रात्री मानसिक ताण तणावामुळे त्रस्त असतात. अशा परिस्थितीत चहा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. चहामध्ये अँटीऑक्सिडन्ट्स आणि नैसर्गिक फाइटोकेमिकल्स असतात. त्यामुळे मानसिक ताणतणाव कमी होतो. त्यामुळे तुम्हाला शिथिलता जाणवते आणि रात्री आरामात झोप येऊ शकते.

विषविमुक्त होणे: रात्री चहा प्यायल्यामुळे शरीर विष मुक्त होते, म्हणजेच शरीरातून हानिकारक पदार्थ बाहेर पडतात. शरीर विषमुक्त झाल्याने व्यक्ती निरोगी राहतो. त्वचाही चांगली राहते. यासोबतच, चांगली झोप येण्यातही मदत होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

23 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

23 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

23 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

23 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

23 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

23 तास ago