आरोग्य

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य चांगलं ठेवण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. संतुलित आहार घेतला तरच मेंदुचं आरोग्य चांगलं राहतं. असं केलं नाही तर तुमच्या मेंदुचं आरोग्य बिघडतं. कारण पोट आणि मेंदू यांच्यात खास संबंध असतो.

पोटाच्या समस्या थेट मानसिक आरोग्यावर प्रभाव पाडतो. यात सगळ्यात घातक बद्धकोष्ठतेची समस्या आहे. जर तुम्हाला सुद्धा खूप दिवसांपासून ही समस्या असेल तर याने तुमची स्मरणशक्ती कमजोर होऊ शकते. याने मेंदुची काम करण्याची क्षमता प्रभावित होते आणि डिमेंशिया म्हणजे विसरण्याची समस्या होते. त्यामुळे कधीही बद्धकोष्ठतेची समस्या हलक्यात घेऊ नका.

मेंदुवर कसा प्रभाव करते बद्धकोष्ठतेची समस्या

बद्धकोष्ठतेची समस्येवर जर वेळीच उपचार केले नाही तर याने मेमरी लॉल म्हणजे डिमेंशिया होण्याचा धोका असतो. याने विचार करण्याची आणि गोष्टी समस्याची किंवा लक्ष केंद्रीत करण्यासही समस्या येते. रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, दिवसातून दोन वेळ शौचास जाणाऱ्या लोकांमध्ये ही समस्या जास्त बघायला मिळते. या रिसर्चमध्ये ब्रेन आणि गट हेल्थमध्ये खास संबंध असल्याचं सांगण्यात आलं आहे.

खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे बद्धकोष्ठतेची समस्या वाढते. कमी वयात सुद्धा ही समस्या बघायला मिळते. या समस्येत पोट चांगलं राहत नाही आणि मेंदुवर याचा प्रभाव पडतो. या समस्येमुळे केवळ मेंदुच्या क्रियांवरच नाही तर कोलन कॅन्सर आणि टाइप-३ डायबिटीसचाही धोका राहतो. इतकंच नाही तर यामुळे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरही होऊ शकतो.

बद्धकोष्ठतेवर उपाय

डाएटमध्ये जर फायबर कमी असेल आणि पाणीही कमी पित असाल बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते. याचा अर्थ हा आहे की, पोट साफ होत नाही. यामुळे तोंडाची दुर्गंधी येऊ शकते आणि अनेकदा उलटी सुद्धा येते. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या टाळण्यासाठी आहारात फायबर असलेल्या पदार्थांचा समावेश करा. दिवसभर भरपूर पाणी प्या. तसेच तळलेले, भाजलेले आणि मसालेदार पदार्थ खाऊ नका.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

15 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

15 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

15 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago