मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९०० खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रकल्पाचे काम ‘फास्टट्रॅक’ पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेताना त्यांनी प्रशासकीय दिरंगाई सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. रुग्णालयाची इमारत पूर्ण झाली असली तरी वीज जोडणीअभावी कामकाज सुरू होऊ शकलेले नाही. त्यामुळे आवश्यक वीज जोडणी, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची खरेदी, इमारतीची स्वच्छता आणि शासनाने मंजूर केलेली १,०७८ नवीन पदे तातडीने भरण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या प्रकल्पात ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय, २०० खाटांचे महिला व बाल रुग्णालय आणि २०० खाटांचे सुपरस्पेशालिटी संदर्भ सेवा रुग्णालय एकाच संकुलात कार्यरत होणार आहे. कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, नेफ्रोलॉजी आणि ऑनकोलॉजीसारख्या विशेष उपचार सुविधा येथे उपलब्ध असतील. तसेच १६ आधुनिक ऑपरेशन थिएटर्स आणि एअर ॲम्ब्युलन्ससाठी हेलीपॅडचीही सुविधा असणार आहे.हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे व पालघर जिल्ह्यातील लाखो नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यातच अत्याधुनिक आणि मोफत उपचार मिळतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…