आरोग्य

उन्हात घराबाहेर जात नाही मग व्हिटॅमिन D मिळणार कस, ४ पदार्थ खा- तब्येत राहील ठणठणीत

तब्येत ठणठणीत ठेवायची असेल तर आपल्या आहारात सगळे पौष्टिक घटक पाहिजेतच. व्हिटॅमिन डी हा सुद्धा एक असाच अतिशय महत्त्वाचा घटक. हाडं मजबूत ठेवण्यासाठी तो उपयुक्त ठरतो. त्याशिवाय जर शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर केस गळायला लागतात, नखं तुटतात, रोगप्रतिकारक शक्ती कमी होत जाते आणि चेतना संस्थेवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे शरीराला पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळायला हवं. आता आपल्याला हे माहितीच आहे की सकाळचे कोवळे ऊन हे व्हिटॅमिन डी चा सगळ्यात उत्तम स्त्रोत आहे. पण बहुतांश लोकांचं त्या वेळेत घराबाहेर पडणं होत नाही. शिवाय जे बाहेर पडतात त्यांनी सनकोट, स्कार्फ, गॉगल असं सगळं घालून शरीर पुर्णपणे झाकून घेतलेलं असतं. मग अशावेळी शरीराला व्हिटॅमिन डी मिळणार कसं म्हणूनच तुमच्या आहारात हे काही पदार्थ नियमित असू द्या जेणेकरून शरीरातील व्हिटॅमिन डी ची कमतरता दूर होईल.

व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असणारे पदार्थ

1) मशरूम: इंटरनॅशनल सेंटर फॉर कॉस्मेटिक मेडिसिन यांनी मांडलेल्या अभ्यासानुसार मशरूम हा व्हिटॅमिन डी चा एक उत्तम स्त्रोत आहे. मशरूमचे आणखी एक वैशिष्ट्य असे की त्यामध्ये कॅलरी खूप कमी प्रमाणात असतात. त्यामुळे वजन वाढण्याचाही धोका नसतो. त्यामुळे मशरूमचे पदार्थ तुमच्या आहारात नियमितपणे असू द्या..

2) संत्री: संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं हे आपल्याला माहितीच आहे. पण त्यासोबतच त्यामध्ये व्हिटॅमिन D limonene हा घटकही असतो. त्यामुळे व्हिटॅमिन डी आणि सी हे दोन्ही देणारं संत्र नियमितपणे खायलाच हवं.

3) चीज: व्हिटॅमिन डी चांगल्या प्रमाणात देणारं चीज लहान मुलांच्याही अतिशय आवडीचं असतं. त्यामुळे वेगवेगळ्या पदार्थांच्या माध्यमातून चीज खा आणि मुलांनाही खाऊ घाला.

4) दूध: दूधामधूनही चांगल्या प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळतं. त्यासोबतच पनीर, तूप या पदार्थांमधूनही व्हिटॅमिन डी मिळते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

13 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago