आरोग्य

दही खात असाल तर पहा काही नियम…

आपल्या पैकी बरेच जण आवडते म्हणून दही मिळेल त्यावेळेस हवे तसे खात असतो आणी कधी कधी तर आपल्या लक्षात देखील येत नाही की आपल्याला सतावणाऱ्या एखाद्या तक्रारीचे मुळ कारण आपण खात असलेले हे दहीच आहे म्हणून.

तर मग दही कधी खाऊ नये ह्याचे काही नियम आयुर्वेद सांगते ते आपण पाहूयात…

१) दही रात्रीच्या वेळेस मुळीच खाऊ नये.

२) दही गरम करुन खाऊ नये कारण गरम दही हे आयुर्वेद विषवत मानते.

3) अदमुरे दही तर मुळीच खाऊ नये हा पण जर संडासला घट्ट होण्याची सवय अथवा त्रास असेल तेव्हा काही दिवस उपचाराचा भाग म्हणून आपण ह्याचे सेवन करू शकता पण नियमीत नाही.

४) दही हा पदार्थ आपल्या आहारामंध्ये रोज खाऊच नये.

५) दही नुसते कधीच खाऊ नये तर त्यामध्ये सैंधव, खडी साखर असे काही तरी घालून खावे.

६) उन्हाळा, वसंत ऋतू, शरद ऋतुमध्ये दही खायचे नाही कारण ते शरीरास अपाय कारक ठरू शकते तसे पाहता निसर्ग नियमच असा आहे की ह्या ऋतूत दही चांगले विरजत देखील नाही.

७) डोके दुखी, सर्दी, पडसे, त्वचारोग, अम्लपित्त, संडासला आगहोणे, लघवीची जळजळ, रक्तदोष, कोड, अंगावर सूज येणे, रक्तस्राव, पांडूरोग, चक्कर येणे ह्या तक्रारी असल्यास दही खाऊ नये.

८) दही हे मासे, अंडी, मांस, फळे, भाज्या, कडधान्य ह्यात मिसळून कधीच खाऊ नये कारण असे केल्यास शुक्रदोष, डोळ्यांचे विकार, त्वचा रोग, रक्त विकार, अंगावर किंवा आतील अवयवांना सूज येणे, रक्तविकार होऊ शकतात.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मालवणीत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई:💞 मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हंडी फोडताना विटांचा…

1 तास ago

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

15 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

16 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

16 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

16 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

16 तास ago