आरोग्य

शरीराच्या या भागात वाढलंय दुखणं, म्हणजे युरिक एसिड वाढल्याचं लक्षण

अनेकदा लोक सांध्यात हलके दुखणे किंवा सूज आली असेल तर त्याकडे दुर्लक्ष करत असतो. परंतू हे दुखणं तुमच्या शरीरात हाय युरिक एसिड पातळीचे संकेत असू शकतात. वेळीच या लक्षणांना ओळखावे.कारण पुढे जाऊन संधीवात सारखा आजार तुम्हाला होऊ शकतो. डॉक्टरांच्या मते युरिक एसिडटी पातळी वाढल्यास ते क्रिस्टलच्या रुपात जमू लागतात. आणि त्यामुळे सुज येते आणि शरीराचा दुखरा भाग लालसर होऊन तीव्र वेदना होतात.

यूरिक एसिड वाढल्यावर कुठे दुखते

याच्या अंगठ्यात तीव्र दुखणे: हे सर्वसामान्य लक्षण आहे. दुखणे अचानक सुरु होते आणि रात्रीचे हे दुखणे अधिक असते.

गुडघे आणि घोट्यांमध्ये सूज: सुज येऊन गरम होणे आणि दाब पडल्याने दुखणे वाढू शकते

हाताची बोटे आखडणे: खासकरुन सकाळी काम करताना हाताने काही काम करताना त्रास होतो

टाचेमध्ये दुखणे: चालताना आणि उभे रहाताना त्रास होतो

यूरिक एसिड वाढण्याची कारणे

जास्त प्रमाणात रेड मीट आणि सीफूडचे सेवन

साखर,गोड पदार्थांचे प्रमाण जास्त

मद्य आणि बिअरचे जास्त प्रमाण

लठ्ठपणा आणि कमी सक्रीय असणे

किडनीच्या समस्येमुळे युरिक एसिड योग्य प्रकारे शरीराबाहेर न पडणे

डॉक्टरांकडे केव्हा जावे

जर तुम्हाला वारंवार या भागात दुखत असेल, सूज आणि लालसरपणा जाणवत असेल लागलीच रक्त तपासणी करावी. खूप काळ दुर्लक्ष केले तर क्रॉनिक संधीवात, किडनी स्टोन आणि किडनी डॅमेज होण्यापर्यंत हे जाऊ शकते.

हाय यूरिक एसिडपासून वाचण्याचे उपाय

रोज किमान ८ ते १० ग्लास पाणी प्या

मटण, मद्य आणि साखरेचे ड्रीक्स टाळा

ताजी फळे,हिरव्या भाज्या डाएटमध्ये सामील करा

नियमित एक्सरसाईज करा, वजन नियंत्रिक राखा

लो-फॅट डेअरी प्रोडक्ट्सचे सेवन करावे

शरीराच्या कोणत्याही भागात सतत दुखत असेल तर दुर्लक्ष करु नका. खास करुन सांध्यात दुखत असेल. हाय युरिक एसिड जर वाढले असले तर वेळीच त्याचा शोध लावून त्यावर उपचार केल्यास सांध्यांचे आयुष्य वाढू शकते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

12 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago