आरोग्य

बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारी खास स्मुदी, बेस्ट उपाय

बॅड कोलेस्टेरॉल शरीरात जमा होणारा मेणासारखा एक चिकट पदार्थ असतो. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल असतात एक म्हणजे गुड कोलेस्टेरॉल आणि दुसरं म्हणजे बॅड कोलेस्टेरॉल. गुड कोलेस्टेरॉल शरीरासाठी खूप महत्वाचं असतं. पण हेच जर वाढलं तर ते बॅड कोलेस्टेरॉल असतं जे हृदयासाठी खूप घातक असतं. आजकाल भरपूर लोकांना बॅड कोलेस्टेरॉलची समस्या होत आहे. याला कारण खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीची लाइफस्टाईल. बॅड कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतं आणि त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे हार्ट अ‍ॅटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो. अशात नसांमध्ये जमा झालेलं कोलेस्टेरॉल बाहेर काढणं खूप महत्वाचं असतं.

चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे जसं बॅड कोलेस्टेरॉल शरीरात वाढतं, तसं काही खास गोष्टी खाऊन याला कंट्रोलही केलं जाऊ शकतं. आयुर्वेदिक डॉक्टर सलीम जैदी यांनी अशाच एक नॅचरल ड्रिंकबाबत सांगितलं आहे.

काय लागेल साहित्य

स्मूदी तयार करण्यासाठी तुम्हाला 1 कप ताजी पालक लागेल. एक मध्यम आकाराचं केळ घ्या. एक छोटा चमचा फ्लॅक्स सीड्स म्हणजे अळशीच्या बिया घ्या. अर्धा कप ताजं दही घ्या. या सगळ्या गोष्टी एका मिक्सरमध्ये टाका आणि स्मूदी तयार करा. गोडवा हवा असेल तर यात तुम्ही एक छोटा चमचा मधही टाकू शकता.

कसा मिळतो फायदा

पालक: पालकात फायबर भरपूर असतं, ज्यामुळे आतड्यांमध्ये जमा कोलेस्टेरॉलचं अवशोषण कमी होतं आणि शरीरात जमा अतिरिक्त कोलेस्टेरॉल बाहेर निघतं.

केळ: केळ्यांमध्ये फायबरसोबतच पोटॅशिअमचं प्रमाणही भरपूर असतं. जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं.

दही: दह्यातील प्रोबायोटिक्समुळे पचन तंत्र मजबूत राहतं, ज्यामुळे कोलेस्टेरॉल कंट्रोल करण्यास मदत मिळते.

अळशीच्या बिया: अळशीच्या बिया शरीरात वाढलेलं कोलेस्टेरॉल कमी करण्यास खूप फायदेशीर असतं. या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड भरपूर असतं. ज्यामुळे कोलेस्टेरॉल कंट्रोल करण्यास आणि हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत मिळते. ही स्मूदी तुम्ही रोज एकदा सकाळी नाश्त्याआधी आणि नंतर एकदा दुपारच्या जेवणाआधी पिऊ शकता. 1 ते 2 महिने नियमितपणे ही स्मूदी प्याल तर तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

5 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

8 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

9 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

9 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

9 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

10 तास ago