आरोग्य

घामामुळे मांड्या घासून रॅश येते, मग हे घरगुती उपाय करा

उन्हाळा सुरू झाल्यावर अनेक त्रास सुरू होतात. सतत घाम येतो. घशाला कोरड पडते. उन्हामुळे चक्कर येते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. अति उष्णतेमुळे अस्वस्थ व्हायला होते. शरीर सारखं डिहायड्रेटेड होते. ओठांनाही सारखी कोरड पडते. चेहरा अगदी करपून निघतो. अशा समस्यांवर आपण विविध उपाय करतच असतो. एक त्रास उन्हाळ्यात असाही होतो, ज्यामुळे चालायचेच वांदे होऊन जातात. हा प्रकार म्हणजे मांड्या कचणे. आपण दिवसभर बाहेर असलो की घाम येत राहतो. आलेला घाम जनेंद्रियांजवळ साठतो. तो तसाच साठून राहिल्याने मग मांड्यांजवळ लाल- लाल चट्टे पडतात.

मांडीला पुरळ येते. सतत खाज सुटत राहते. खाजवल्याशिवाय स्वस्थता मिळत नाही आणि खाजवल्यावर त्यातून रक्त यायला लागते. हा त्रास जाड मांड्या असणार्‍या महिलांमध्ये जास्त उद्भवतो. मांड्यांचे घर्षण झाल्याने तेथील त्वचा घासली जाते आणि मग रॅश येतात. काही सोपे व साधे असे उपाय आहेत, जे केल्याने मांड्यांना होणारा हा त्रास टाळता येतो.

१) उन्हाळ्यामध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात घाम येतो. तो घाम पुन्हा शरीरामध्ये मुरतो. घरी असताना हा घाम सतत पुसणे किंवा पाण्याने शरीर स्वच्छ करणे शक्य होते. मात्र दिवसभर कामानिमित्त बाहेर असणार्‍यांना हा घाम साफ करता येत नाही. तो तसाच राहतो. जर शरीरापाशी हवा खेळती राहिली तर, घाम त्रासदायक ठरत नाही. त्यामुळे सैल सुटसुटीत असे कपडे वापरायचे. जाड कापड असलेले कपडे वापरायचे नाहीत. पातळ कापडाचेच कपडे वापरा. हवा खेळती राहिली की त्रास होणार नाही.

२) अंघोळ केल्यावर शरीर व्यवस्थित कोरडे करून घ्यावे. मग सर्वच अवयवांना पावडर लावावी. पावडर लावल्याने शरीरवर रॅश उठत नाही.

३) मांडी काचल्यावर मांडीला खोबरेल तेल लावावे. घासून घासून त्वचा कोरडी झाली असते. खोबरेल तेलामुळे मांड्यांना हाव असणारा थंडावा मिळतो. रात्री झोपतानाही मांड्यांना तेल लावायचे. मांड्या मोकळ्या ठेऊन झोपायचे. सकाळपर्यंत रॅश नक्कीच गायब होईल.

४) जर तुम्हाला खुपच घाम येत असेल तर, कामावरून घरी आल्यावर जरा कोमट पाण्याने अंघोळ करा. शरीरातील उष्णताही कमी होईल आणि घामही धुतला जाईल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

14 तास ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

16 तास ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

21 तास ago

फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजारच जडला! हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…

24 तास ago

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

1 दिवस ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

1 दिवस ago