आरोग्य

मुरूम, खाज, लाल चट्टे व इतर स्किन अ‍ॅलर्जी झाल्यास ट्राय करा ‘हे’ रामबाण घरगुती उपाय

बेकिंग सोडा:- स्किन अ‍ॅलर्जीपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. बेकिंग सोडा स्वयंपाकघरातील असा एक पदार्थ आहे जो अनेक समस्यांवर लाभदायक ठरतो. पण बेकिंग सोडा वापरताना थोडी काळजी घेण्याची आवश्यकता असते. बेकिंग सोडा त्वचेत पीएच संतुलन राखण्यास मदत करतो.

कसा करावा वापर:- त्वचेवर बेकिंग सोडा वापरण्यासाठी सर्वप्रथम एक चमचा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात थोडं पाणी मिक्स करा. आता याची पातळ व मऊ अशी पेस्ट बनवून अ‍ॅलर्जी झालेल्या जागेवर लावा. १० मिनिटांनंतर ही पेस्ट धुवा. अ‍ॅलर्जीपासून मुक्ती मिळवण्यासाठी दिवसातून ३ ते ४ वेळा तुम्ही याचा वापर करू शकता.

कोरफडीचा गर:- कोरफडीमधील औषधी गुणधर्मांच्या व्याप्तीबद्दल आपण सारेच जाणून आहोत. कोरफडीचा वापर अनेक गोष्टींत व अनेक प्रकारे केला जातो. कोरफडीचा ज्यूस देखील लोक तितक्याच प्रमाणात वापरतात. स्किन अ‍ॅलर्जीपासून सुटका मिळवण्यासाठी कोरफड एक रामबाम उपाय आहे. जर तुम्हाला अ‍ॅलर्जीमुळे शरीरावर खाज व त्वचा कोरडी पडण्याची समस्या उद्भवत असेल तर कोरफडीचा गर खाज व जळजळ अगदी सहज व झटपट रोखेल.

कसा करावा वापर:- खाजेपासून सुटका मिळवण्यासाठी सर्वप्रथम कोरफड घेऊन त्वचेवर लावा. जर तुमच्याकडे कोरफडीचे झाड नसेल तर तुम्ही बाजारातून विकत आणून किंवा अ‍ॅलोवेरा जेलचा देखील वापर करू शकता. ३० ते ४० मिनिटे कोरफडीचा गर अ‍ॅलर्जी झालेल्या ठिकाणी लावून ठेवा. काहीच दिवसांत खाज व जळजळीच्या समस्येपासून मुक्ती मिळेल.

खोबरेल किंवा नारळ तेल:- खोबरेल तेल स्किन केयरसाठी सर्वात उत्तम तेल आहे. यामध्ये मॉइस्चराइजिंग गुणधर्म असतात जे अ‍ॅलर्जी झालेल्या काळात त्वचेची रक्षा करतात. इतकंच नाही तर नारळ तेल अ‍ॅलर्जीमुळे होणारी खाज देखील थांबवतं.

कसा करावा वापर:- एका वाटीत थोडं खोबरेल तेल घ्या आणि ५ सेकंदासाठी ते गरम करा. हे कोमट तेल त्याजागी लावा जिथे तुम्हाला अ‍ॅलर्जी झाली आहे. लक्षात ठेवा, तेल अ‍ॅलर्जी झालेल्या ठिकाणी फक्त लावा चुकूनही मालिश करू नका. १ तास तेल तसंच राहू द्या. या तेलाचा वापर तुम्ही ३ ते ४ तासांनी पुन्हा करू शकता.

अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर:- अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरचा वापर लोक सामान्यत: वजन कमी करण्यासाठी आणि पचनक्रियेसंबंधित त्रास दूर करण्यासाठी केला जातो. पण हे फक्त वजन कमी करणं किंवा डायजेशन ठीक करण्यासाठीच नाही तर उत्तम स्किन केयर एजंटही आहे. यामध्ये अ‍ॅसिटीक अ‍ॅसिड असतं, जे त्वचेवरील खाज व अ‍ॅलर्जी कमी करतं. पण नाजूक त्वचेवर याचा वापर करू नये.

कसा करावा वापर:- एक कप गरम पाण्यात एक टिस्पून अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर मिसळा. आता कापसाच्या बोळ्याने हे मिश्रण अ‍ॅलर्जी झालेल्या ठिकाणी लावा. आता हे सुकण्यासाठी ठेवा आणि काही वेळानंतर थंड पाण्याने जागा धुवून घ्या. हा उपाय तुम्ही दिवसातून कमीत कमी २ वेळा करू शकता.

टी-ट्री ऑइल:- टी-ट्री ऑइल मुरूमांपासून सुटका मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. स्किन अ‍ॅलर्जीमध्येही हे तेल लाभदायक ठरते. यामध्ये अ‍ॅंटीमायक्रोबियल आणि अ‍ॅंटी इन्फ्लमेट्री गुणधर्म असतात, जे कित्येक प्रकारच्या अ‍ॅलर्जीपासून सुटका मिळवून देण्यास मदत करतात. त्वचेवरील लाल चट्टे आणि खाज यासाठी टी-ट्री ऑइल चांगला उपाय आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘सीएम-सृष्टी’ नव्हे, ही तर ‘सीएम-तुष्टी’! पेपरफुटीवर मौन, विद्यार्थ्यांवर दडपशाही; अमोल मातेले

‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई :…

6 तास ago

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

1 दिवस ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

2 दिवस ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

2 दिवस ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

2 दिवस ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

2 दिवस ago