आरोग्य

हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवर्जून खा हे पदार्थ

तूप:- आपल्याला वाटते की, तूप कॅलरीज वाढवते पण तुपाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यावर शरीरातील खराब चरबी कमी होते आणि तुमचे शरीर उबदार ठेवण्यास मदत मिळते.

गूळ:- पचनक्रिया सुधारण्यासाठी गूळ हा अत्यंत फायदेशीर पदार्थ आहे, जो आपल्याला हिवाळ्यात उबदार ठेवतो.

गरम सूप:- हिवाळ्यात सायंकाळी एक वाटी गरम सूप प्यायला कोणाला आवडत नाही? झटपट उब मिळविण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.

सुका मेवा:- हिवाळ्यात सुका मेवा हा एक उत्तम पर्याय असतो. अॅप्रिकोट, अंजीर व खजूर हे नैसर्गिक उबदारपणा देतात.

केशर:- जर तुम्हाला हिवाळ्यात तुमचे शरीर उबदार ठेवायचे असेल, तर तज्ज्ञांच्या मते, दुधात केशर उकळून, त्यात मनुके टाकावेत.

धान्य:-  बाजरी, नाचणी यांसारख्या धान्यांचा हिवाळ्यात तुम्ही आस्वाद घेऊ शकता.

दालचिनी:- दालचिनी ही शरीराच्या चयापचय क्रिया सुधारण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दालचिनीच्या सेवनाने शरीरात उष्णता निर्माण करण्यास मदत होते आणि म्हणूनच हिवाळ्यात दालचिनीचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.

तीळ:- तीळ हे श्वसनाशी संबंधित अनेक आजार दूर ठेवण्यास मदत करतात. तिळाचे लाडू, तिळाची बर्फी इत्यादी स्वादिष्ट पदार्थांचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता.

तुळशी आणि आले:- तुम्ही कधी चहामध्ये आले आणि तुळशीचे पाने टाकून पाहिले आहे का? एकदा करून पाहा. आले आणि तुळशीच्या पानांचा चहा अत्यंत आरोग्यदायी आहे.

मध: हिवाळ्यात सर्दी आणि फ्ल्यूचा सामना करण्यासाठी मध हा अत्यंत उपयुक्त आहे. न्युट्रिशनिस्ट करिश्मा चावला सांगतात, “मध थोड्या प्रमाणात खावा. कारण- त्यात कॅलरीज जास्त आहेत.” त्या पुढे सांगतात, “काजू, बिया, कांदे, लसूण, सफरचंद आणि इतर फळे, कच्चे सॅलड, मोड आलेली कडधान्ये फायबर आणि प्रथिनयुक्त असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. अँटिऑक्सिडंट्स, झिंक, चांगली चरबी असलेले पदार्थ खावेत.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

9 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

4 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

4 दिवस ago