आरोग्य

डाळ खाल्ल्यानंतर गॅस, अ‍ॅसिडिटी, ब्लोटिंगचा त्रास मग हे 5 उपाय कराच

‘डाळ’ हा आपल्या भारतीय आहारातील सर्वात महत्वाचा पदार्थ आहे. रोजच्या आहारात आपण हमखास वेगवेगळ्या डाळींचा समावेश करतोच. डाळीमध्ये फायबर, प्रथिने, लोह, झिंक, फोलेट आणि मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. विशेषतः शाकाहारी लोकांसाठी डाळी प्रथिनांचा एक उत्कृष्ट स्रोत मानल्या जातात. त्यामुळे भारतातील बहुतांश घरांमध्ये दररोज आहारात डाळ तयार केली जाते. डाळ आहारातील महत्वाचा पदार्थ असला तरी अनेकांना डाळ खाल्ल्यानंतर गॅसेस, ॲसिडिटी किंवा ब्लोटिंगसारख्या पचनाच्या तक्रारी होतात. पोट फुगणे, जड वाटणे, जळजळ होणे किंवा सतत ढेकर येणे ही सामान्य लक्षणं असू शकतात. यामागे डाळी योग्य रीतीने न शिजवणे, अतिरिक्त मसाल्यांचा वापर, किंवा एखाद्या विशिष्ट डाळीचा वेगळा गुणधर्म अशी अनेक कारणे असू शकतात

अनेकदा डाळ खाल्ल्यामुळे आरोग्याच्या वेगवेगळ्या तक्रारी सतावतात ज्यामुळे डाळ खाणं अनेकांना त्रासदायक वाटू लागतं. पण याचा अर्थ असा नाही की आपण डाळ खाणं बंदच करावं. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी डाळ करताना काही खास उपायांचा वापर केल्यास डाळ खाल्ल्यानंतर पोटाशी संबंधित अनेक समस्या टाळतात येतात. यामुळे फक्त त्रास कमी होणार नाही, तर डाळींची चव देखील अधिक स्वादिष्ट होईल. यासाठी काय करायचं ते पाहा…

डाळ खाल्ल्यानंतर गॅसेस, ॲसिडिटी किंवा ब्लोटिंग का होते

मुळातच डाळींमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे ज्या लोकांच्या रोजच्या आहारात फायबरचं प्रमाण कमी असतं, त्यांना डाळ खाल्ल्यानंतर पोट फुगणे किंवा गॅसची समस्या अधिक जाणवते. याशिवाय, डाळींमध्ये FODMAPs नावाचे काही प्रकारचे साखरेचे घटक असतात. हे घटक काही लोकांच्या शरीरात अधिक प्रमाणात गॅस तयार होण्याचं आणि पोट फुगण्याचं मुख्य कारण ठरू शकतात. त्यामुळे ही समस्या काही लोकांमध्ये अधिक तीव्रतेने जाणवते.

शिल्पा शेट्टी करते एक उपाय, चेहऱ्यावर चमक-फिगर मेण्टेन! चाळिशीतही दिसतेय हॉट कारण…

डाळ खाल्ल्यानंतर गॅसेस, ॲसिडिटी किंवा ब्लोटिंग होऊ नये म्हणून… 

१) न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह पांचाळ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन डाळीमुळे होणाऱ्या ब्लोटिंगविषयी काही उपयुक्त उपाय सांगितले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, ” खरी समस्या डाळीत नाही, तर ती तयार करण्याच्या पद्धतीत असू शकते. डाळ योग्य पद्धतीने शिजवली नाही तर ती पचनासाठी अवघड ठरू शकते.

२) जर डाळ खाल्ल्यानंतर ब्लोटिंगची समस्या टाळायची असेल, तर प्रत्येकवेळी डाळ शिजवताना त्यामध्ये हिंग घालणं अत्यंत महत्त्वाचं आहे. श्वेता शाह यांच्या म्हणण्यानुसार, हिंग घालण्यामुळे डाळींमधील कार्बोहायड्रेट्सचे विघटन होण्यास मदत होते, जे अनेकदा पोटात गॅस तयार होण्याचं प्रमुख कारण असतात. त्यामुळे हिंग वापरल्यास डाळ अधिक सहज पचते आणि पोटाशी संबंधित तक्रारी टाळता येतात.

3) डाळ अगदी सहजतेने पचायला हवी म्हणून मोहरी, जिऱ्याची फोडणी द्यावी. डाळीला जिरे, मोहरीची फोडणी दिल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. ज्यामुळे पोटाशी संबंधित त्रास, जसे की गॅस, फुगणे किंवा जडपणा, यापासून आराम मिळतो.

४) डाळ खाल्ल्यानंतर गॅसेस, ॲसिडिटी किंवा ब्लोटिंग होऊ नये म्हणून लिंबाचा रस फायदेशीर ठरतो. डाळ शिजून झाली की त्यात थोडासा लिंबाचा रस घाला. लिंबाचा रस फक्त डाळीचा स्वादच वाढवत नाही, तर आयर्नच्या शोषणात मदत करतो आणि पचन एन्झाईम्सना देखील ॲक्टिव्ह करतो, ज्यामुळे डाळी सहजपणे पचायला मदत होते.

५) डाळीमुळे होणाऱ्या ब्लोटिंगपासून बचाव करण्यासाठी, डाळ शिजवण्याआधी ती कमीत कमी ८ ते १० तास भिजत ठेवणं आवश्यक आहे. हे केल्याने डाळींमधील फायटिक अ‍ॅसिड कमी होतो, ज्यामुळे ती पचायला अधिक सोपी होते. यामुळे पोटात गॅस, फुगणे किंवा जडपणा यांसारख्या समस्या टाळता येतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शालेय शिक्षण विभाग राज्यातील सर्वाधिक भ्रष्ट विभाग; लोकसेवा हक्क कायद्याची पायमल्ली – आमदार सत्यजीत तांबे

मुंबई: राज्यातील शालेय शिक्षण विभाग हा सर्वाधिक भ्रष्ट विभाग बनला असून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची…

3 तास ago

खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांची जाहीर माफी मागावी; पत्रकार संघाची मागणी

मुंबई: नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत…

12 तास ago

संविधान रक्षणासाठी संघर्षाची तयारी ठेवा; अनुसूचित जातींची भूमिका महत्त्वाची; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशात लोकशाही आणि संविधान धोक्यात असून संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्वांनी एकजुटीने संघर्ष करण्याची…

12 तास ago

संजय राऊतांविरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार; खासदार ज्योती वाघमारे

नवी दिल्ली: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या कथित…

12 तास ago

पत्रकारांशी झालेल्या वादाबाबत खासदार संजय पाटील यांची जाहीर माफी

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय पाटील यांनी पत्रकारांशी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जाहीर दिलगिरी व्यक्त करत…

12 तास ago

शिंदोडी गावात रात्रीच्या वेळेस दिसली ‘ड्रोन’ सदृश्य वस्तू; संशयास्पद वस्तूमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

शिरुर (तेजस फडके) शिंदोडी गावात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळेस आकाशात ड्रोनसदृश्य वस्तू फिरत असल्याचे…

17 तास ago