तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. याचे वर्णन प्राचीन भारतातील ग्रंथांमध्येही आढळते. त्याचवेळी, त्याचे गुणधर्म वेदांमध्ये देखील सांगितले आहेत. तुळशीच्या बियांना सब्जा बियाणे, फालुदा बियाणे आणि तुकमरिया बियाणे अशा अनेक नावांनी ओळखले जाते. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. सर्दी झाली की तुळशीचा आणि लवंगाचा चहा प्यायला पाहिजे असे अनेकदा वडीलधारी मंडळी सांगतात. त्याचप्रमाणे तुळशीमुळे तुम्हाला अनेक आजारांपासून आराम मिळतो.
बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल
तुळशीच्या बियांचा वापर करुन पोटाची समस्या देखील दूर होते. कारण ते शरीराला नैसर्गिकरित्या डिटॉक्स करण्यास मदत करते. तसेच पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. याचे नियमित सेवन केल्यास मल पास होणेही सोपे होते. तुळशीच्या बिया नैसर्गिक रेचक म्हणून काम करतात, ज्यामुळे शरीराच्या आतड्याची हालचाल वाढण्यास मदत होते. कोमट दूध आणि पाण्यासोबत तुळशीचे सेवन केल्यास पचनाच्या समस्यांशिवाय पोट फुगणेही कमी होते.
शुगर रुग्णांसाठी मोठे वरदान
तुळशीच्या बियांचे सेवन शुगरच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरु शकते. कारण त्यात भरपूर फायबर असते. जे रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. यासाठी तुळशीच्या बिया रात्रभर पाण्यात भिजवाव्या लागतील. त्यानंतर सकाळी एक ग्लास दुधात या बिया टाकून प्या. यामुळे तुम्हाला इन्सुलिनमध्ये सुधारणा दिसून येईल.
वजन कमी करण्यास मदत
जर तुम्ही लठ्ठपणाने त्रस्त असाल तर तुळशीच्या बिया तुमचे वजन कमी करू शकतात. तुळशीमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड जास्त असते. जे वजन कमी करण्यास मदत करते. याशिवाय त्यात अल्फा-लिनोलेनिक अॅसिड कंपाऊंड देखील आहे. त्यामुळे तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते.
(सोशल मीडियावरून साभार)
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…