भरतीच्या नावाखाली केवळ घोषणांचा पाऊस; NET-SET, Ph.D. धारकांची फसवणूक होत असल्याचा ॲड. अमोल मातेले यांचा आरोप
मुंबई: उच्च शिक्षणातील ६५९ पदांच्या भरतीची घोषणा करून राज्य सरकारने सुशिक्षित बेरोजगार तरुणांची पुन्हा एकदा दिशाभूल केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे प्रदेश प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी केला आहे. २०२२ पासून सरकार सातत्याने भरतीच्या घोषणा करत असले तरी प्रत्यक्षात कायमस्वरूपी भरती पूर्ण झालेली नसल्याचा दावा त्यांनी केला.
मातेले यांनी म्हटले की, अवघ्या ६५९ पदांच्या भरतीसाठी डिसेंबर २०२६ पर्यंतची मुदत मागणे हा सरकारचा वेळकाढूपणा आहे. “आमदार पळवून सरकार स्थापन करण्यासाठी २४ तास पुरतात, पण काहीशे पदे भरण्यासाठी चार वर्षे लागतात का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज्यातील विद्यापीठे आणि अनुदानित महाविद्यालये आजही मोठ्या प्रमाणावर तासिका तत्त्वावरील (CHB) प्राध्यापकांच्या भरवशावर सुरू असल्याचे सांगत, अशा परिस्थितीत विद्यापीठांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय रँकिंग कसे सुधारणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
सरकारने महाविद्यालयांची आर्थिक माहिती पोर्टलवर उपलब्ध करून पारदर्शकतेचा दावा केला असला, तरी वर्षानुवर्षे रिक्त असलेल्या हजारो शिक्षक व शिक्षकेतर पदांची माहिती जाहीर करण्याचे धाडस सरकार दाखवत नसल्याची टीकाही त्यांनी केली.
राज्यातील हजारो NET, SET आणि Ph.D. धारक उमेदवार वयोमर्यादा संपण्याच्या उंबरठ्यावर असून, कायमस्वरूपी भरती न झाल्याने त्यांच्या भविष्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप करत, सरकारने घोषणांचा खेळ थांबवून तातडीने भरती प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी ॲड. अमोल मातेले यांनी केली.
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…