शिरूर तालुका

पालकांनी रागावल्याच्या कारणावरून घरातून निघून गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन दिल्या पालकांच्या ताब्यात

शिरूर गुन्हे प्रकटीकरण पथकाची कौशल्यपूर्ण कामगिरी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत शिरूर शहरामधून दिनांक १६ मे रोजी व दिनांक १७ मे रोजी दोन अल्पवयीन मुली त्यांचे राहते घरातून कोणास काहीएक न सांगता निघून गेल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. सदरबाबत शिरूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ३३४/२०२५ व ३३९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२) अन्वये गुन्हे दाखल करून सदरच्या दोन्ही गुन्ह्यांचा तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्याकडे देण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य व संवेदनशीलता ओळखून शिरूर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांनी तात्काळ गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व पोलीस अंमलदार यांचे तपास पथक तयार करून मुलींचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते. सदरच्या दोन्ही अल्पवयीन मुलींकडे कुठलाही मोबाईल नसल्याने व त्यांना कोणी नेले असावे व कशामुळे नेले असावे याबाबत पालकांना देखील माहिती नसल्यामुळे सदरचे गुन्हे उघड करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.

परंतु प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पो. स्टे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांचे आधारे सदरच्या दोन्ही मुलींचा शोथ घेऊन दोन्ही मुली दिनांक १८मे रोजी त्यांचे पालकांचे ताब्यात दिल्या आहेत. तसेच निघून गेलेल्या दोन्ही मुलींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांचे पालकांशी झालेल्या भांडणाचे किरकोळ कारणावरून रागाच्या भरात घरातून निघून गेल्याबाबत तपासात सांगितले असून पुढील तपास सुरू आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक, संदीप गिल पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधिक्षक

रमेश चोपडे, पुणे ग्रामीण, उपविभागीय अधिकारी शिरूर विभाग प्रशांत ढोले , पोलीस निरीक्षक व प्रभारी अधिकारी संदेश केंजळे शिरूर पोलीस स्टेशन, शिरूर पो स्टे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार दीपक राऊत, पोलीस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, सचिन भोई, नीरज पिसाळ, निखिल रावडे, अजय पाटील, रवींद्र आव्हाड, अशोक वितारे, महिला पोलीस अंमलदार गोदावरी थंदरे,महिला पोलीस अंमलदार कल्याणी कोडवते यांचे पथकाने केली आहे…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

4 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago