आरोग्य

आहारात व्हिटॅमिन बी-१२ चा समावेश

शरीरात व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता असेल, तर आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. निरोगी जीवनशैलीसाठी नियमित व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टींचा योग्य समतोल राखला तर आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.

संतुलित आहारात फळे, हिरव्या पालेभाज्या, दूध, मांस, अंडी इत्यादी खाद्यपदार्थांचा समावेश करावा. या सर्व घटकात व्हिटॅमिन्स, मिनरल्स इत्यादी पोषकतत्वांचा समावेश असतो. ही सर्व तत्वे शरीराच्या विकासासाठी फायदेशीर ठरतात. या पोषकतत्वात व्हिटॅमिन बी-१२ चा ही समावेश आहे. हे व्हिटॅमिन शरीरारासठी अतिशय लाभदायी आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी, मेंदूचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी आणि शरीरातील लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी हे व्हिटॅमिन अतिशय महत्वाचे आहे. जर व्हिटॅमिन बी-१२ चा समावेश करायचा असेल तर पुढील पदार्थांचा आहारात समावेश करावा.

दूध: दूध हे कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन बी-१२ चा उत्तम स्त्रोत आहे. आरोग्यासाठी दूध अतिशय लाभदायी आहे. कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन बी-१२ व्यतिरिक्त दुधात प्रथिने, खनिजे, इतर पोषक घटकांचे विपुल प्रमाण आढळते.

मासे: त्वचा, केसांसाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर असणारे मासे खायला अनेकांना आवडते. प्रथिने सोबतच व्हिटॅमिन बी-१२ चा उत्तम स्त्रोत म्हणून माशांना ओळखले जाते. सार्डिन, ट्यूना, सॅल्मन, ट्राउट इत्यादी प्रकारच्या माशात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी-१२ आणि इतर पोषक घटक आढळतात.

दही: जर तुम्ही शाकाहारी असाल आणि मासे, अंडी, चिकन हे खाद्यपदार्थ खात नसाल, तर दह्याचा आहारात समावेश करवा. दह्याला प्रथिने, कॅल्शिअम, व्हिटॅमिन बी-१२ चा प्रमुख स्त्रोत म्हणून ओळखले जाते. दह्यामुळे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत होते.

पनीर-चीज: व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता दूर करण्यासाठी आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करावा. या पदार्था पैकी पनीर, चीज, दही इत्यादी गोष्टींचे सेवन करण्याला प्राधान्य द्या. या खाद्यपदार्थात व्हिटॅमिन बी-१२ विपुल प्रमाण असते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

4 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

4 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

4 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

4 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

10 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

10 तास ago