आरोग्य

१८ वर्षानंतर उंची वाढत नाही हा गैरसमज! मुलांना या ३ गोष्टींची सवय लावा उंची वाढेल…

आपल्यापैकी अनेकजण उंचीवर नाखुश असतात. काहींची ऊंची फार कमी किंवा फार जास्त असते. उंची कमी असल्याने अनेक गोष्टीत माघार घ्यावी लागते. उंची ही १८ वयापर्यंतच वाढते असं म्हणतात. पण हे खरं आहे का? १८ वयानंतर उंची वाढत नाही का? उंची वाढवण्यासाठी पालक मुलांना पौष्टिक आहार, जीवनशैलीत बदल आणि व्यायामही करायला सांगतात.

१८ वर्षांनंतर उंचीमध्ये मोठे बदल क्वचितच दिसून येतात, पण योग्य आहार आणि जीवन शैलीमुळे हाडे आणि पॉस्चरमध्ये बदल होऊ शकते. कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि प्रथिने समृद्ध संतुलित आहार आणि नियमित व्यायामामुळे ऊंची आणि एकूणच आरोग्य सुधारू शकते.

१८ वर्षानंतर उंचीमध्ये बदल घडू शकते का

१८ वर्षानंतर उंचीमध्ये फारसा बदल होत नाही. पौष्टिक आहार, व्यायाम आणि आरोग्यदायी सवयी यामुळे शरीरात बरेच बदल घडतात. यामुळे शरीर फिट होते. आपण ही सवयी मुलांना १८ वर्षाआधी लावू शकता.

लहानपणा पासून मुलांच्या आहाराकडे लक्ष द्यायला हवे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी शरीराला पोषक तत्त्वांची गरज असते.

स्नायू तयार करण्यात प्रथिने खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. याशिवाय हाडांच्या विकासासाठीही ते महत्त्वाचे आहे. कडधान्ये, काजू आणि सोयाबिनमध्ये प्रथिने चांगल्या प्रमाणात असतात.

उंची वाढवण्यासाठी काय मदत करू शकते

कॅल्शियम: कॅल्शियम हाडे मजबूत करण्यासाठी आवश्यक आहे. दूध, हिरव्या पालेभाज्या आणि फोर्टिफाइड पदार्थांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते.

व्हिटॅमिन डी: कॅल्शियमचे योग्य शोषण करण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. आपण व्हिटॅमिन डीयुक्त पदार्थ खाऊ शकता.

प्रथिने: स्नायूंच्या विकासासाठी आहारात प्रथिने असणे गरजेच आहे. यासह वेट लॉससाठी मदत होते. अनेक शाकाहारी पदार्थांमध्ये प्रथिने असते.

झिंक: झिंकच्या कमतरतेमुळे उंचीवर परिणाम होते. यासाठी आहारात कडधान्यांचा समावेश करा.

केवळ पोषणच नाही तर जीवनशैलीतील काही बदलही उंची वाढवण्यास मदत करू शकतात. जसे की, स्ट्रेचिंग एक्सरसाइज, पुरेशी झोप आणि शरीर हायड्रेट ठेवणंही गरजेच आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago