महाराष्ट्र

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचे ‘जागतिक ज्ञानपीठ’ उभारणार

घाटकोपरमध्ये ३०० कोटींच्या संशोधन केंद्राचे भूमिपूजन

मुंबई : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी घाटकोपर येथे ३०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हे केंद्र केवळ स्मारक नसून अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची प्राणप्रतिष्ठा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समता, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाचा संदेश जगभर पोहोचवणारे हे केंद्र ‘जागतिक ज्ञानपीठ’ ठरेल. या प्रकल्पासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या प्रकल्पामध्ये २० मीटर उंचीचा अण्णाभाऊ साठे यांचा कांस्य पुतळा, ‘फकिरा’ कादंबरीवर आधारित जगातील सर्वात मोठे पुस्तक शिल्प, आधुनिक ग्रंथालय, संशोधन व प्रशिक्षण केंद्र, कौशल्य विकास केंद्र, UPSC-MPSC स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केंद्र, डिजिटल ऑडिओ-व्हिज्युअल दालन आणि मुलांसाठी डिस्कव्हरी झोन उभारण्यात येणार आहेत.

अण्णाभाऊ साठे हे शोषित, वंचित, शेतकरी, कामगार आणि कष्टकरी समाजाचे प्रेरणास्थान असल्याचे सांगत शिंदे यांनी त्यांच्या साहित्य आणि विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांचा वारसा अण्णाभाऊंनी आपल्या साहित्य व चळवळीतून पुढे नेल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देताना २४१ पात्र कुटुंबांचे सन्मानाने पुनर्वसन करण्यात येत असून कोणत्याही कुटुंबावर अन्याय होणार नाही, अशी हमीही त्यांनी दिली. तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या मूळ गावी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे ५० कोटी रुपयांच्या निधीतून भव्य स्मारक आणि पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, संजय शिरसाट, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, मुंबईच्या महापौर रितू तावडे, खासदार, आमदार आणि विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

3 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago