आरोग्य

कुरडू अथवा कोंबडा वनस्पती

रस्त्याच्या कडेला असणारी ही वनस्पती अत्यंत गुणकारी आहे. कुरडू नाव तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल. या वनस्पतीला पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची फुले असतात. पहायला सुंदर असलेली ही वनस्पती शेताच्या बांधावर शेतामध्ये पडीत जमिनीवर आपोआप उगवते. याला कुरडू, पांढरा कोंबडा, मोर पंख असेसुद्धा म्हणतात.

कुर्डू ही वनस्पती अनेक व्याधींवर फायदेशीर आहे. सांधेदुखी जाण्यासाठी, नामर्दाला मर्द बनवणारी, कमजोरी दूर करण्यासाठी, थकवा जाण्यासाठी, मुतखडा बाहेर काढण्यासाठी, दाताचे कोणतेही विकार असो, म्हणजे दातातील किडा बाहेर काढण्यासाठी, दात दुखत असेल तर दुखणे नाहीसे करण्यासाठी, कमी करण्यासाठी, दातातून रक्त येत असेल तर ते बंद करण्यासाठी याचा फायदा होतो.

ज्या लोकांचे पोट साफ होत नाही, पोटात दुखणे, पोट गॅस धरणे या संबंधीचा त्रास असेल, तर या वनस्पतीची चार पाने दोन दिवस सकाळी उठल्यानंतर किंवा संध्याकाळी चार पाने नक्की खा. याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही. ही वनस्पती कफ, वात, पित्तशामक आहे. या वनस्पतीच्या फुलांमध्ये काळे व चमकदार बीज असते. हे बीज आयुर्वेदामध्ये अति उपयुक्त मानले जाते. आयुर्वेदानुसार यांच्या बिया मूत्रल, शितल, शक्ती, बुद्धी वाढवणारे, व रुची वाढवणारे असतात, आणि या बिया कोणत्याही आयुर्वेदिक स्टोअर्समध्ये सहज मिळतील.

जर आपल्याला वारंवार लघवी होत असेल, लघवी करतेवेळी दुखत असेल, लघवीला जळजळ करत असेल, तर या बियांचे चूर्ण 2 ग्रॅम, आणि खडीसाखर 2 ग्रॅम याप्रमाणे दोन वेळा दिवसातून घेतल्यास आपली लघवी साफ होण्यासाठी मदत होईल. जळजळणे थांबेल आणि लघवीच्या जागी दुखणे सुद्धा थांबेल.

काही लोकांना पोटासंबंधी चा कोणताही विकार नसतो तरी देखील त्यांच्या पोटात दुखणे, पोट गडगडणे अशा समस्या निर्माण होत असतात. तर अशा व्यक्तींनी या वनस्पतीची मुळे चावून-चावून मुळीचा रस पिऊन घ्यायचा. असे तुम्ही तीन ते सात दिवस केले तर पोटासंबंधी कोणत्याही तक्रारी निर्माण होणार नाहीत. या वनस्पतीच्या बिया नियमित खाल्ल्यामुळे मुतखडा, किडनी साफ होते. मुतखड्यासाठी आयुर्वेदिक औषध म्हणून कुर्डू वनस्पती च्या बिया वापरल्या जातात.

मुतखडा बाहेर काढण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. याशिवाय मूत्रपिंडाचे अनेक आजार नाहीसे करण्यासाठी सुद्धा या वनस्पतीच्या बिया चा उपयोग केला जातो. त्यासाठी आपण त्याच्या बियांची पावडर व अर्धा चमचा मध, एकत्र करून सकाळ संध्याकाळ उपाशीपोटी सेवन केले, तर मुतखड्याचा त्रास नाहीसा होण्यास मदत होईल आणि त्याचबरोबर मूत्रपिंडा संबंधित अनेक समस्याही दूर होतील.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

16 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

16 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

17 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

17 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

22 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

22 तास ago