आरोग्य

लसणाची सालं फेकून न देता या पद्धतीनं करा घरगुती लसूण पावडर

लसणाची सालं अनेकदा आपल्या किचनमध्ये निरूपयोगी समजून फेकून दिली जातात. ही सालं सरळ कचऱ्याच्या डब्यात फेकली जातात. पण तुम्हाला माहिती आहे का याच सालींचा वापर करून तुम्ही फ्लेवरफूल गार्लिक पावडर बनवू शकता. लसणाची सालं एक उत्तम सिजनिंग इंग्रेडिएंट आहेत. जी तुम्हाला अनेक रेसिपीजमध्ये वापरता येतील. ज्यामुळे पदार्थाला चांगली चव येईल. इतकंच नाही तर फ्लेवरही वाढेल. आरोग्याच्या दृष्टीनंही याचे अनेक फायदे आहेत. लसणाच्या मदतीने तुम्ही लसणाची पावडर बनवू शकता.

लसणाची पावडर बनवण्याची योग्य पद्धत

सगळ्यात आधी लसूण व्यवस्थित धुवून घ्या. जेणेकरून त्यावर कोणतीही घाण किंवा किटकनाशक असतील तर निघून जातील. नंतर ही सालं उन्हात व्यवस्थित सुकवून घ्या. जर तुम्ही ऊन्हात सुकवू शकत नसाल तर ओव्हनमध्ये सुकवू शकता. सुकल्यानंतर ही सालं मिक्सर ग्राईंडरमध्ये घालून व्यवस्थित वाटून घ्या. ही पावडर तुम्ही कोणत्याही एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकता. जेव्हा गरज असेल तेव्हा याचा वापर करा.

पीठ मळताना सॅलेड, सूप बनवताना, भातात फ्लेवर घालण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. यामुळे युनिक टेस्ट येईल आणि रेस्टोरंटसारखी स्पेशल रेसिपी बनेल. जेव्हा तुम्ही लसणाचा वापर कराल तेव्हा सालं बाहेर फेकण्याऐवजी कोणत्याही भांड्यात ठेवा. जेव्हा सालं भरपूर जमा होतील तेव्हा याची पावडर बनवून कुकींगसाठी वापरा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

23 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago