आरोग्य

अति वाढलेले पोट, वजन, लठ्ठपणा या घरगुती उपयांनी कमी करा

लठ्ठपणा एक आजार असून यामुळे केवळ पर्सनॅलिटी खराब होते नाही तर हा इतर आजारांनाही आमंत्रण देतो. लठ्ठपणा वाढल्यास हाय ब्लडप्रेशर, कंबरदुखी, हृदयाचे आजार, गुडघेदुखी यासारखे आजार होण्याचा धोका वाढतो. यामुळे वजन कमी करण्यासाठी लोक डायटिंग करतात किंवा तास न् तास जिममध्ये घाम गाळतात परंतु तरीही वजन कमी होत नाही. कारण त्यांचा डाएट चार्ट योग्य नसतो. आहाराकडे योग्य लक्ष आणि थोडासा व्यायाम केल्याने वजन लवकर कमी करणे शक्य आहे. आज आम्ही तुम्हाला असेच काही छोटे+छोटे उपाय सांगत आहोत ज्यामुळे 7 दिवसात तुमचे वजन कमी होऊ लागेल.

1) पपईचे नियमित सेवन करावे. हे फळ प्रत्येक ऋतूमध्ये मिळते. पपईचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते.

2) दह्याचे सेवन केल्याने चरबी कमी होण्यास मदत होते. दिवसातून दोन-तीन वेळेस ताक प्यावे.

3) पिंपळाच्या सालीचे चूर्ण भाजून घ्या, दररोज तीन ग्रॅम हे चूर्ण ताकामध्ये टाकून घेतल्यास बाहेर आलेले पोट कमी होईल.

4) वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी टोन्ड दुध, टोन्ड दही आणि टोन्ड पनीरचा वापर करावा. या पदार्थांमध्ये कॅलरी कमी असतात, परंतु पोट भरलेले जाणवते.

5) आवळा आणि हळद समान मात्रामध्ये बारीक करून चूर्ण तयार करा. हे चूर्ण ताकामध्ये टाकून घ्यावे. या उपायाने वजन जलद गतीने कमी होऊ लागेल.

6) दररोज सकाळी आणि संध्याकाळी चालावे. कमीत कमी 4 किलोमीटर चालण्याचा नियम करावा. दुपारचे जेवण केल्यानंतर शतपावली अवश्य करावी. जर तुम्ही रात्री 8:30 नंतर जेवण करत असाल तर पोळी आणि भाताऐवजी डाळ आणि भाज्यांना जास्त प्राथमिकता द्या. रात्री हलका आहार घ्यावा.

7) जेवणात वरून मीठ घेऊ नये. परंपरागत मसाले अन्नाची केवळ चव वाढवत नाहीt तर यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट , एंटीऑक्सीडेंट आणि फायबरही असते. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की, हे मसाले भाजण्यासाठी तेलाचा जास्त उपयोग करू नये.

8) वजन लवकर कमी करण्याची इच्छा असेल तर जास्तप्रमाणात पांढरे पदार्थ (बटाटे, मैदा, साखर, तांदूळ) कमी करा आणि मल्टीग्रेन किंवा मल्टीकलर पदार्थ ( डाळी, गहू, गजर, पालक, सफरचंद, पपई) खाण्यावर जास्त भर द्या.

10) सदाफुली झाडाच्या मुळाचे चूर्ण तयार करून घ्या. या चूर्णामध्ये मध टाकून सेवन करा आणि त्यानंतर ताक प्या. प्रसुतीनंतर येणाऱ्या लठ्ठपणामध्ये हा रामबाण उपाय आहे.

11) दररोज सकाळी एक ग्लास थंड पाण्यात दोन चमचे मध टाकून घेतल्यास शरीरातील वसा कमी होण्यास मदत होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गणेशोत्सवाला युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न; ‘बाप्पाचा कट्टा’चा ९० दिवसीय सांस्कृतिक उपक्रम सुरू!

मुंबई: महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाला युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत स्थान मिळवून…

5 तास ago

हाता-पायांना सतत घाम का येतो,कारणे काय? वेळीच करा उपाय

पोटादुखी, अपचन, डिहायड्रेशनची समस्या यांसारखे आजार उद्भवतात. उन्हामुळे त्वचा टॅन होणे, सतत तहान किंवा लघवीला…

6 तास ago

गुडघेदुखीवर पारंपरिक, घरगुती आणि अत्यंत असरदार उपाय,

जसं वय वाढतं तसं गुडघेदुखी ही एक सामान्य पण त्रासदायक समस्या बनते. आजकाल ही समस्या…

6 तास ago

पूर्णेकर हत्या प्रकरणाचे राजकारण नको; दोषींवर कठोर कारवाई करा; एकनाथ शिंदे

मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा माझ्याकडे; निष्पक्ष चौकशीचे पोलिस आयुक्तांना निर्देश ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येची घटना…

6 तास ago

विधान परिषद निकालाने भाजपला जनतेचा इशारा; महायुतीच्या परतीचे दिवस सुरु;  विजय वडेट्टीवार

‘संघभूमीतही भाजपचा प्रभाव दिसला नाही’; ओबीसी आरक्षणावरून सरकारला घेरले, १ नोव्हेंबरच्या दिल्ली आंदोलनाची घोषणा नागपूर:…

6 तास ago

‘भ्रष्टाचाराच्या मलईसाठी गुजरातच्या कंपनीला सह्याद्री विकला’; हर्षवर्धन सपकाळ

कर्जत-भीमाशंकरच्या जंगलातील वृक्षतोडीवरून काँग्रेस आक्रमक; वनसंपदेच्या रक्षणासाठी न्यायालयात जाण्याचा इशारा कर्जत : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन…

6 तास ago