आरोग्य

सुटलेलं पोट, वाढलेलं वजन झपाट्याने कमी करण्यासाठी आहारात करा ‘हे’ ५ बदल

बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना वाढलेले वजन ही गोष्ट सातत्याने सतावत असते. वाढलेल्या वजनामुळे आजकाल अनेक जण चिंताग्रस्त झाल्याचे दिसून येते, कारण जास्त वजनामुळे शरीराला हळूहळू विविध आजार ग्रासू शकतात. वजन कमी करण्यासाठी अनेक जण तासन् तास जिममध्ये जाऊन घाम गाळतात. एवढेच नव्हे, तर खाण्या-पिण्यावरसुद्धा नको तितके नियंत्रण ठेवून डाएटिंग केले जाते. मात्र, तरीसुद्धा त्यांच्या पदरी निराशाच पडते. अशा वेळी काय करावे, असा मोठा प्रश्न अनेकांसमोर उभा असतो. वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही सुपर फूड्सचा समावेश करू शकता.

वजन कमी करण्यासाठी ५ सुपरफूड्स, आहारात करा समाविष्ट

१) अ‍ॅव्होकॅडो: अ‍ॅव्होकॅडो वजन कमी करण्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. हे फळ खाल्ल्याने भूक शांत होण्यास मदत होते. हे फळ चव आणि आरोग्याने परिपूर्ण आहे. हेल्दी फॅट, फायबर, मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि अनेक प्रकारचे पोषक घटक अ‍ॅव्होकॅडोमध्ये आढळतात. अ‍ॅव्होकॅडोमध्ये कॅलरीज खूप कमी असतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

२) क्विनोआ: क्विनोआ हे पिक आता जगभरात प्रसिद्ध होवू लागलं आहे. खास करून मुबलक फायबर आणि कमी कॅलरीज असल्यानं वजन कमी करण्यासाठी क्विनोआचा आहारामध्ये समावेश वाढू लागला आहे. क्विनोआमध्ये इतर धान्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात प्रोटीन उपलब्ध असतं. तसंच यात व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम, फॉस्फरस, आयरन मुबलक प्रमाणात आढळतं.

3) चिया बिया: चिया बियाचं सेवन आजकाल भरपूर लोक करतात. कारण चिया सीड्स पौष्टिक आणि आरोग्यदायी असतात. यामध्ये जीवनसत्त्वे, फायबर, लोह, कॅल्शियम, जस्त, फॉस्फरस, ओमेगा-३ फॅटी अॅसिडस् आणि अँटिऑक्सिडंट्स यांसारखे अनेक पोषक घटक असतात. वजन कमी करण्यासाठी चिया बिया खूप फायदेशीर मानले जाते.

४) सॅल्मन: सॅल्मन हा एक प्रकारचा मासा आहे. जर तुम्ही मांसाहारी असाल तर तुम्ही याचा आहारात समावेश करू शकता. यामध्ये आढळणारे ओमेगा-३ फॅटी अॅसिड वजन कमी करण्यास मदत करते.

५) ग्रीन टी: वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर. ग्रीन टी प्यायल्याने आपली चयापचय क्रिया वाढते आणि वजन कमी होण्यास मदत होते. ग्रीन टीमध्ये अनेक अशी तत्त्वे असतात, जी फॅट बर्न करण्याची प्रक्रिया वाढवतात, त्या प्रक्रियेला वेग देतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

9 तास ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

10 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

14 तास ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

14 तास ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

14 तास ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

14 तास ago