आरोग्य

मोबाइल वापरताना ३ चुका टाळा, पँटच्या खिशात, उशीखाली मोबाईल ठेवत असाल तर जन्मभर पस्तावाल

मोबाइल फोन तर सगळेच वापरतात. आत्ताच्या काळात मूलभूत गरजा अन्न, वस्त्र , निवारा आणि मोबाइल फोन असं म्हणावं लागेल. कारण त्याच्याशिवाय आपण आता राहूच शकत नाही. त्याचे फायदे तोटे हा मुद्दा येतच नाही. त्याची गरज प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाला आहे. एकमेकांशी संवाद साधणं मोबाइलमुळे शक्य झाले आहे. आत्ताही तुम्ही मोबाइलवरतीच ही माहिती वाचत असाल. एकंदरीत काय तर मोबाइल प्रचंड महत्त्वाचा झालेला आहे. तो आपण आपल्या बरोबर सगळीकडे घेऊन जातो. चार्जिंग संपले की जीव वर-खाली होतो. मोबाइलचा वापर बंद करणे आता शक्य नाही. शेवटी ते यंत्रच. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम आलेच. मोबाइल हाताळताना या ३ गोष्टी कायम लक्षात ठेवा.

1) पॅन्टच्या किंवा शर्टच्या खिशात मोबाइल ठेवण्याची आपल्याला सवय असते. मोबाइलमधून ईएमएफ रेडीएशन तयार होतात. त्या शरीरासाठी चांगल्या नाहीत. या इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडीएशन्स स्वास्थ्यासाठी हानिकारक असतात. असे अनेक रिसर्चमधून सिद्ध झाले आहे. त्यामुळे मोबाइल शरीराला टेकून राहणार नाही याची काळजी घ्या. बॅगेच्या कप्यामध्ये फोन ठेवा. शरीरापासून लांबही राहील आणि सुरक्षितही राहील.

2) आपल्याला तासंतास फोनवर बोलायची सवय असते. मोबाइल तेवढा वेळ आपल्या कानाला चिकटून असतो. काहींचे तर कामच फोनवरून चालते. अशांना फोनवर कमी बोला सांगू शकत नाही.जास्त वेळ फोनवर बोलल्यावर कान गरम व्हायला लागतो. त्याचे कारण या रेडियेशनच आहेत. मस्त उपाय म्हणजे फोनवर बोलताना इअरफोन्सचा वापर करा. फोन कानापासून लांब राहील.

3) उशीच्याखाली मोबाइल ठेवण्याची सवय बऱ्याच जणांना असते.पण ती सवय चांगली नाही. रात्री शरीर दिवसभराचा थकवा दूर करत असते. मोबाइलच्या रेडियेशन तसं होऊ देत नाहीत. त्यामुळे झोपताना मोबाइल लांब ठेवा मगच झोपा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

1 तास ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

1 तास ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

1 तास ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

2 तास ago

महाराष्ट्रात डिजिटल प्रॉपर्टी कार्डची तयारी; मालमत्ता व्यवहार होणार अधिक सुरक्षित आणि पारदर्शक.

मुंबई : राज्यातील जमिनीच्या आणि मालमत्तेच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता, सुरक्षितता आणि मालकी हक्क अधिक बळकट करण्यासाठी…

2 तास ago

अनेक आजारांवर एरंडेल तेल गुणकारी

रात्रीचं जागरण, अवेळी झोपणं, उठणं, यामुळे पित्त होणं, पोट साफ न होणं, अपचन, बद्धकोष्ठता, उष्णता…

2 तास ago