आरोग्य

पावसाळ्यात वाढते मलेरिया- डेंगूची साथ, इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी ५ उपाय करा

पावसाळा सुरु झाला की वातावरणात गारवा पसरतो. परंतु या ऋतूमध्ये अनेक आजार देखील उद्भवतात. दूषित पाण्यामुळे अनेक आजार वाढतात. पावसाळ्यात लहान मुले आणि वयोवृद्ध असणारी माणसं लगेच आजारी पडतात. इतकेच नाही तर आपल्याला या काळात चांगल्या आहारासह, स्वच्छ पाणी, हलका व्यायाम करणे देखील महत्त्वाच आहे.

पावसाळ्यात सर्दी-ताप आणि खोकल्याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात ठिकठिकाणी पाण्याचे तळे पाहायला मिळतात यामुळे साथीच्या रोगासह मलेरिया आणि डेंगूचा आजार देखील वाढतो. दूषित पाण्यामुळे अनेक संसर्गजन्य आजार वाढतात. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असते त्या लोकांना या आजाराचा धोका सर्वाधिक असतो. रोगप्रतिकारशक्ती चांगले असेल तर ती आपल्याला अनेक संसर्गजन्य आजाराशी लढण्यास मदत करते. जर आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर आपण नैसर्गिकरित्या ती वाढवू शकतो. योग्य प्रकारचा आहार घेतला तर रोगप्रतिकारशक्ती वाढवता येते. पावसाळ्यात आपला आहार कसा असायला हवा जाणून घेऊया.

1) पावसाळ्यात आपण आहारात हंगामी फळांचा समावेश करायला हवा. ज्यामुळे शरीराला योग्य पोषणतत्व मिळेल. पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती मजबूत करायची असेल तर आहारात जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असलेली फळे खा. आहारात सफरचंद, पेर, बेरी, मनुका, पपई, डाळिंब, चेरी, लिची आणि केळी यांसारखी फळे खा.

2) पावसाळ्यात बाजारात अनेक रानभाज्या आणि हिरव्या भाज्या येतात. भाज्या खाण्यापूर्वी त्या नीट स्वच्छ करुन मगच खा. आपल्या ताटात कारले, दुधीभोपळा, काकडी, बिन्स, भेंडी आणि टोमॅटो यांसारख्या भाज्यांचा समावेश केल्याने आतड्यांचे आरोग्य निरोगी राहिल तसेच रोगप्रतिकारशक्ती देखील वाढेल.

3) स्वयंपाकघरात असणारे मसाले आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात. त्यासाठी आहारात आपण लसूण, आले, हळद, वेलची, जायफळ, काळीमिरी आणि दालचिनीसारखे मसाले आहारात असायला हवे. यामध्ये बॅक्टेरियाविरोधी, दाहक-विरोधी, अँटीव्हायरल, अँटीमायक्रोबिल आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे गुणधर्म आहेत.

4) हर्बल टी आपली रोगप्रतिकारशक्ती आणि एकूण आरोग्य देखील वाढवू शकते. दररोज आले किंवा तुळशीचा हर्बल चहा प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

5) ड्रायफ्रुट्स हे प्रत्येक ऋतूमध्ये खायला हवे. यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. जे पेशी निरोगी ठेवू शकतात. ज्यामुळे आपली प्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते.

(सोशल मीडियावरून साभार)

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

7 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

8 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

11 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

11 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

12 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

12 तास ago