आरोग्य

रोज सकाळी दालचिनीचे पाणी पिण्याचे अनेक फायदे

दालचिनी ही स्वयंपाकघरात जितकी फायदेशीर आहे तितकीच ती आपल्या आरोग्यासाठी देखील बहुगुणी मानली जाते. यात असणारे अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आरोग्याच्या समस्यांपासून मुक्त करतात.

आपण नियमितपणे दालचिनीचे पाणी प्यायले तर त्याचे आरोग्याला फायदे होतात. दालचिनीमुळे आपले वजन कमी होऊ शकते, तसेच त्वचेच्या अनेक आजारांपासून आपली सुटका होईल.

वजन कमी करायचे असेल तर दालचिनीचे पाणी उपयुक्त आहे. सकाळी प्यायल्याने भूक नियंत्रणात राहिल. तसेच शरीरातील चरबी कमी होईल.

साखरेची पातळी कमी करण्यासाठी दालचिनीचे पाणी खूप फायदेशीर आहे. यामुळे शरीरातील इन्सुलिन सुधारण्यास मदत होते. तसेच रक्तातील साखरेची पातळी स्थिर होते.

दालचिनीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. जे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करतात.

दालचिनी पचनसंस्थेसाठी फायदेशीर आहे. यात असणारे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म पोटातील संसर्ग दूर करतात. तसेच पोटाशी संबंधित असणाऱ्या समस्या टाळण्यात येतात.

कपभर पाण्यात दालचिनीचा तुकडा घालून रात्रभर ठेवा. पाणी गाळून त्यात लिंबाचा रस किंवा मध घालून हे पाणी नियमितपणे प्या, आरोग्याला फायदा होईल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

13 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago