नारळ हे एक फळ आहे. नारळात अनेक औषधी गुण आहेत. ओल्या नारळातील गराचा वापर सौंदर्य प्रसाधनात केला जातो. नारळ पाणी स्वाथ्यासाठी पौष्टीक असते. कार्बोहाइड्रेट, प्रोटीन, मिनरल्स, व्हिटामिन असे सर्व पोषक घटके नारळापासून मिळतात. जेवणाला पर्याय म्हणून खोबरे खाऊ शकतात. नारळात फायबर्स मोठ्या प्रमाणात आढळतात. अपचन, छातीत जळजळीचा त्रास असणार्यांनी नारळाचा गर सेवन केल्यास लाभ होतो.
अनियमित मासिक पाळीचा त्रास असणार्या महिलांनी रोज १९ ग्रॅम ओल्या नारळाचा गर खावा. तसेच गायीचे दूधही प्यावे. मासिक पाळी संबंधी सर्व समस्या सुटतील. शीघ्रपतनाचा त्रास असणार्या पुरूषांनी रोज सुखे खोबरे आणि गायीचे दूध प्यायल्याने विशेष लाभ होतो. नारळ पाणी पोटाचे विकार दूर करण्याचे काम करते. अल्सर सारखा आजार बरा होतो. किडनी, थायरॉइड, डायबिटीज, मुत्राशयाचा विकार असलेल्यांनी नारळ पाणी मोठ्या प्रमाणात सेवन करावे. नारळात अनेक व्हिटामीन असतात ते पचनास फार लाभदायी असतात. पोट दूखत असल्यास किंवा गॅस झाल्यास नारळ पाणी प्यावे. नारळ पाण्याने उलटीही थांबते.
नारळ खोकल्यावर एक रामबाण उपाय आहे. नारळाच्या दूधात एक चमचा खसखस आणि एक चमचा मध मिसळून रोज रात्री पिल्याने फायदा होतो. तोंडात फोड असल्यास ओले नारळाचा गर खावा आणि जास्तीत जास्त नारळ पाणी प्या. नारळाचे तेल रोज त्वचेवर लावल्यास त्वचा सतेज होते. आंबट दही, मुलतानी माती, खोबरेल तेल एकत्र करून लावल्यास केस चमकदार होतात. दररोज दोन तीन नारळाचे पाणी सेवन केल्यास चेहरा उजळतो.
हिवाळ्यात रोज रात्री सुखे खोबरे खावे. रात्री झोपताना चेहरा, मान, त्वचेवर खोबरेल तेल लावून हाताने हळूवार मसाज करावी. सकाळी उठल्यावर पाण्याने चेहरा धुऊन घ्यावा. काही दिवसातच सुरकुत्या नाहीशा होतील. नारळाचा गर चेहर्यावर लावल्याने, चेहऱ्यावरील व्रण नाहिसे होतात. गर्भवती महिलांनी रोज नारळाचा गर खाल्याने प्रकृती ठणठणीत राहते, तसेज सुदृढ बाळ जन्माला येते. खोबरेल तेलात बदाम बारिक करून टाकावे. डोके दुखीवर हे तेल रामबाण औषधीचे काम करते. पोटात जंत झाल्यास रोज सकाळी किसलेले खोबरे खावे.
(सोशल मीडियावरून साभार)
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…