आरोग्य

सकाळी चालणे आरोग्यासाठी फायद्याचे

जर तुम्ही रोज पहाटे चालत असाल तर तुम्हाला जे फायदे सकाळी मिळतात, ते मिळणार नाहीत.

जर आपण योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने चाललात तर तुम्हाला आरोग्यदायी असे अनेक फायदे मिळतील. होय सकाळी कोवळे ऊन येत असताना सहा साडेसहाच्या दरम्यान जर तुम्ही कोवळ्या उन्हामध्ये चालायला सुरुवात कराल तर तुम्हाला भरपूर फायदे मिळू शकतात.

सकाळी चालणे आवश्यक का आहे

जेव्हा तुम्ही सकाळी चालायला जाता तेव्हा कोवळे ऊन जर असेल तर तुम्हाला विटामिन-डी भरपूर प्रमाणात मिळेल, त्यामुळे शरिरातील विटामिन-डी ची कमतरता भरुन निघेल. दररोज सकाळी चालण्यामुळे ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळेल. अंधारात ऑक्सीजन कमी उपलब्ध असल्यामुळे तो कमी मिळतो, कारण रात्री झाडे कार्बन डायऑक्साइड सोडतात. आपल्या हाडांना मजबूत करण्यासाठी कॅल्शियम सोबतच विटामिन-डी खूप आवश्यक असते, जर योग्य प्रमाणात कोवळे ऊन तुम्हाला मिळाले तर शरीरात कॅल्शियम चा उपयोग योग्य पद्धतीने होऊ शकतो.

तणावमुक्ती साठी उपयोगी

मानसिक ताणतणाव असणाऱ्या व्यक्तींना सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरणे अत्यंत उपयुक्त आहे, किबहुना आवश्यकचं आहे. यामुळे सकाळी चालण्याने मिळणारे सर्व फायदे डिप्रेशन कमी करण्यासाठी उपयोगी उपयुक्त आहेत. त्याच बरोबर जर तुम्ही डायबिटीक आहात तर त्या व्यक्तीने कोवळ्या उन्हामध्ये फिरले तर डायबेटिस, ब्लडप्रेशर आणि हृदयरोग त्याच बरोबर मानसिक ताणतणाव दूर राहण्यास मदत होते.

सकाळीच का चालायचे

सकाळी हवेमध्ये प्रदूषण कमी असते, वातावरणात शांतता असते, स्फूर्ती प्रदान करणारे असते. त्याच बरोबर शरीरास व्यायाम होतो. ज्याचा फायदा तुमची ऑक्सिजन लेवल वाढण्यासाठी होतो. यामुळे फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते आणि प्रतिकारशक्तीही वाढते, फक्त चालताना एकमेकांशी गप्पा मारू नयेत हे महत्त्वाचे.

चालण्याचे सर्वसाधारण फायदे

१) त्वचा चमकदार होते.

२) हृदयाचा स्वास्थ्य चांगले राहते.

३) मधुमेह नियंत्रणात राहतो.

४) वजन कमी करण्यासाठी उपयुक्त.

५) मेंदूची कार्यक्षमता वाढते.

६) झोप चांगली लागते.

७) प्रतिकारशक्ती वाढते.

८) कोलेस्ट्रॉल कमी होते.

९) कॅन्सर चे पेशंटना उपयोगी.

१०) मेंदूची कार्यक्षमता वाढते.

११) प्रतिकारशक्ती वाढते.

१२) हृदयाची कार्यक्षमता वाढते.

१३) थकवा दूर होतो.

१४) शरीरात स्फूर्ती येते.

१५) कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत.

१६) चरबीच्या गाठी कमी होण्यास मदत होते.

१७) सर्व प्रकारच्या आजारांपासून मुक्त राहण्यासाठी उपयुक्त.

एकूणच संपूर्ण शारीरिक स्वास्थ्यासाठी दररोज सकाळी कमीतकमी (४५ मिनिटे, ९० मिनिटे) चालणे आवश्यक आहे.

चालणे सुरु करताना काय आहे आवश्यक

१) एक जोडी स्पोर्ट्स शूज.

२) शॉर्ट किंवा लेगिन्स.

३) शॉर्ट टी-शर्ट.

४) महिलांसाठी स्पोर्ट्स ब्रा, हेअर बँड.

५) स्पोर्ट्स वॉटर बॉटल.

6) तुमचा उत्साह.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago