आरोग्य

चमेलीचे आयुर्वेदिक फायदे

अम्लपित्तामुळे किंवा उष्णतेमुळे जीभेला वा तोंडात छाले निर्माण होण्याचा त्रास अनेकांना होत असतो. त्यामुळे तिखट खारट खाल्ले की खूप त्रास होतो. काहीही लावले तरीही आराम पडत नाही अशावेळी चमेली पानांचा काढा करून तोंडात धारण करावा लगेच आराम पडतो. चमेली पानं वाटून व्रणांवर लावावे. दात दुखत असतील तर चमेली पत्र चावावीत.

चमेलीची पाने उत्तम व्रणरोपक म्हणजेच जखमा भरून काढते. चमेलीपत्रसिद्ध तेल लावावे. चमेलीपत्र कुष्ठघ्न आणि कण्डूघ्न सांगितले आहे. शरीरावर खाज सुटत असेल किंवा त्वचारोग असेल तर चमेली पत्र वाटून त्याचा लेप लावावा. खाज सुटणे कमी होते. अनेक त्वचारोग उदा. एक्जीमा, फंगल इन्फेक्शन इ. मधे चमेलीपत्रसिद्ध तेल अथवा पानांचा मूळाचा लेप लाभदायक ठरतो.

डोकेदुखी असेल तर चमेलीच्या मूळांचा काढा करुन त्याचा परिषेक करतात. शिरःशूल चक्कर येणे अथवा मानसिक दौर्बल्यात चमेली तेलाने डोक्याला मालिश केल्याने आराम मिळतो.

थंडीमुळे किंवा पाण्यात सतत काम करण्याने तळपायाला भेगा पडतात अशावेळी चमेलीची पाने वाटून लेप भेगांवर लावावा जखमा लवकर भरतात चमेलीपत्र सिद्ध तेलाने हळूहळू मालीश करावी त्यामुळे तळपाय पुन्हा मऊ व प्राकृत होतात.

कान दुखणे कानात स्त्राव निघणे अशा तक्रारींवर पानांनी सिद्ध तेल कानात टाकल्यास त्रास कमी होतो.

मासिक स्त्राव व्यवस्थित होत नसेल किंवा अवरोध असेल तर पत्र व पुष्प लेप ओटीपोटावर लावतात.

अतिकाम किंवा कमी झोप यामुळे चिडचिडेपणा मानसिक अस्वस्थता जाणवते. अशावेळी चमेलीच्या फुलांचा सुगंध घेतल्यास स्ट्रेस कमी करण्यास मदत होते. अरोमाथेरपी प्रमाणे याचा उपयोग होतो. चमेली पुष्प वाजीकर आहेत. या फुलांचा सुगंध वाजीकरण करणारा आहे.

रक्तविकारांवर चमेली खूप प्रभावी कार्य करते. अनेक औषधी कल्पांमधे चमेलीचा वापर करण्यात येतो. जात्यादी तेल जात्यादी घृत इ. चमेली वापरून केलेली औषधी कल्प आहेत. गंडूष चिकित्सा, लेप, कवलधारण, मालीश तसेच आभ्यंतर सेवनाकरीता वैद्य चमेली कल्पांचा वापर करत करतात. अशी ही चमेली उत्तम त्वक् रोगहर मुखरोगहर व्रण रोपक व याची फुले उत्तम वाजीकर व सौमनस्यजनन करणारे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

5 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

9 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

9 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

9 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

9 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

9 तास ago