आरोग्य

नजर कमजोर, दूरचं नीट दिसत नाही, मुलांनाही लागला चष्मा

हल्ली प्रत्येकाचाच स्क्रिन टाईम खूप वाढला आहे. कामामुळे कित्येकांना तासनतास लॅपटॉप, डेस्कटॉपसमोर बसावं लागतं. कामाचे तास संपल्यानंतर मोबाईल, टीव्ही अशा स्क्रिन समोर असतातच. लहान मुलंही त्याला अपवाद नाहीत. अनेकांचे ऑनलाईन क्लास मोबाईल किंवा लॅपटॉपवर होतात. शिवाय मुलं टीव्हीसुद्धा खूप पाहतात. याचा परिणाम त्यांच्या डोळ्यांवर होतो आहे आणि कमी वयातच मुलांना चष्मा लागतो आहे. एवढंच नाही तर मुलांमध्ये चष्म्याचा नंबरही खूप पटापट वाढत जातो. हे सगळं टाळायचं असेल तर मुलांकडून काही व्यायाम नियमितपणे करून घ्या. यामुळे त्यांचा चष्म्याचा नंबर वाढणार नाही. तसेच नजर सुधारण्यासही मदत होईल.

चष्म्याचा नंबर कमी होण्यासाठी व्यायाम

जेव्हा तुम्ही हे डोळ्यांचे व्यायाम कराल तेव्हा सगळ्यात पहिला नियम हा की स्वच्छ हवेत, मोकळ्या जागी आणि सुर्यप्रकाश येईल त्याठिकाणी बसून हे व्यायाम करा.

१) पहिला व्यायाम म्हणजे डोळे घट्ट मिटा आणि त्यानंतर पुन्हा उघडा. अशी डोळ्यांची उघडझाप साधारण १० वेळा करा आणि असे ५ राऊंड करावे.

२) डोळ्यांची उघडझाप करण्याचा व्यायाम झाल्यानंतर दोन्ही तळहात एकमेकांवर घासा आणि नंतर ते डोळ्यांवर ठेवा. हातांमध्ये निर्माण होणारी उब डोळ्यांसाठी अतिशय चांगली असते. असे ३ ते ४ वेळा करा.

३) यानंतर अगदी सावकाशपणे मान न हलवता डोळे उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने गोलाकार फिरवा. असं साधारण दोन्ही बाजुंनी ५- ५ वेळा करा.

४) यानंतर उजवा किंवा डावा हात समोर करा. हात खांद्याच्या रेषेत सरळ असू द्या. त्यानंतर हाताच्या अंगठ्याकडे नजर केंद्रित करा. अंगठा डावीकडे, उजवीकडे असा प्रत्येकी ५- ५ वेळा फिरवा आणि ते करत असताना अंगठ्याकडेच नजर केंद्रित करा.

५) यानंतर अंगठा वर आणि खाली असा प्रत्येकी ५- ५ वेळा करा. हे करतानाही अंगठ्याकडे नजर स्थिर ठेवा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गुन्हेगाराचा धर्म पाहू नका, गुन्हा पाहा! भाजपचे दुहेरी निकष; सचिन सावंत यांचा हल्लाबोल

‘मुस्लिम आरोपी टाइम बॉम्ब, तर इतर आरोपी फुलबाजा का?’; महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेवरून सरकारला घेरले मुंबई: गुन्हेगारीला कोणताही…

11 तास ago

विधानपरिषदेतील सहा वर्षांच्या कामाचा लेखाजोखा आता पुस्तकबद्ध

राज्यपालांच्या हस्ते डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या चौथ्या खंडाचे प्रकाशन मुंबई: विधानपरिषदेत मांडलेले प्रश्न, शासनाची उत्तरे आणि…

16 तास ago

लोकप्रतिनिधींच्या कामाचा दस्तऐवज समाजासाठी दिशादर्शक ठरेल; एकनाथ शिंदे

मुंबई: विधानपरिषदेतील कामकाज, लोकप्रतिनिधींची जबाबदारी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सभागृहात झालेला संघर्ष यांचा वस्तुनिष्ठ लेखाजोखा मांडणाऱ्या…

16 तास ago

महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय चित्रपट सहनिर्मितीसाठी स्वतंत्र यंत्रणा; कमी बजेटच्या चित्रपटांना मिळणार नवी संधी

इफ्फीतील परिसंवादात सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांची महत्त्वपूर्ण घोषणा; सात दिवसांत चित्रीकरण…

16 तास ago

मेंदुत रक्ताची गाठ तयार झाल्याचं कसं ओळखाल जाणून घ्या काय दिसतात लक्षण

सामान्यपणे जेव्हा एखाद्या व्यक्तीला जखम झाली किंवा कुठं खरचटलं तर रक्त निघतं. हे रक्त निघणं…

19 तास ago

दुधात मध घालून प्यायल्याने हाडे व सांधे मजबूत होऊन गाढ झोप लागते

रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात मध घालून पिणे ही अनेकांच्या घरातील एक अतिशय जुनी सवय आहे.…

19 तास ago