शिरूर तालुका

शिरूर तालुक्याच्या सरहद्दीवर बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू…

शिरूर: जुन्नर आणि शिरूर तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या पारगाव तर्फे आळे परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

रोहित काफरे (वय 8) असे मृत मुलाचे नाव आहे. रोहित याचे आई-वडील शेतात कांदा लागवडीचे काम करत होते. याचवेळी रोहित शेतालगत खेळत असताना ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला आणि रोहितला फरफटत नेऊन ठार केले.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत रोहितचा मृत्यू झाला होता. या घटनेने काफरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या तीन महिन्यांतील बिबट्याच्या हल्ल्यांमधील ही चौथी मृत्यूची घटना आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावारण पसरले आहे.

दरम्यान, या घटनेनंतर वनविभाग आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. ग्रामस्थांनी वनविभागाकडे तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त, पिंजरे लावणे, गस्त वाढवणे आणि परिसर सुरक्षित करण्याची जोरदार मागणी केली आहे. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांचे जगणे असुरक्षित झाले असून, प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

Video: वाघाळे गावात बिबट्याने पोल्ट्री फार्ममधून पाळीव कुत्रा नेला उचलून…

करडे गावात मध्यरात्री घायतडक वस्तीवर घरात घुसून बिबट्याचा श्वानावर हल्ला…

शिरूर तालुक्यात बिबट्या केला जेरबंद; स्थानिकांना दिलासा…

Video: रांजणगाव MIDC परिसरात शिरला बिबट्या…

शिरूर तालुक्यात बिबट्यांसाठी कृत्रिम जंगल केले जाणार विकसीत; कोठे पाहा…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

8 तास ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

15 तास ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

17 तास ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

17 तास ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

17 तास ago

व्होट चोर ज्ञानेश कुमारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…

1 दिवस ago