आरोग्य

फणसासह कधीही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन; नाहीतर उद्भवतील अनेक समस्या

फणस फक्त खाण्यासाठीच चविष्ट नाही, तर आरोग्यासाठीही तो खूप फायदेशीर आहे. त्यात फायबर, जीवनसत्त्वे व अँटीऑक्सिडंट्ससह अनेक प्रकारचे पोषक घटक असतात, जे शरीरासाठी खूप चांगले असतात. त्यामुळे त्याच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्तीदेखील वाढते. परंतु तुम्हाला माहीत आहे का की, काही पदार्थ फणसाबरोबर खाऊ नयेत? असे काही पदार्थ आहेत की, त्यासह फणस खाल्ल्याने तुमच्या आरोग्याचे नुकसान होऊ शकते.

फणसाबरोबर ‘हे’ पदार्थ खाणे टाळा

फणसासह मासे खाणे

फणस आणि मासे एकत्र खाणे खूप हानिकारक असू शकते. ते एकत्र खाल्ल्यामुळे त्वचेच्या समस्या, अॅलर्जी व पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. खरं तर मासे आणि फणस हे दोन्ही पदार्थ उष्ण आहेत. अशा परिस्थितीत त्यांचे एकत्र सेवन केल्याने शरीरात उष्णता वाढू शकते आणि पचनावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. या दोन्हींचे सेवन केल्याने अॅसिडिटी, गॅस किंवा पोटदुखीसारख्या समस्यादेखील उद्भवू शकतात.

फणसासह दुग्धजन्य पदार्थांचे सेवन

फणसासह दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने गॅस, अपचन व अॅसिडीटीची समस्या वाढू शकते. उन्हाळ्यात हे दोन पदार्थ एकत्र खाणे खूप हानिकारक ठरू शकते. त्याव्यतिरिक्त त्वचेच्याही अनेक प्रकारच्या समस्या वाढू शकतात.

दारूचे सेवन

फणस खाल्ल्यानंतर वाइन किंवा बीअरसारखी अल्कोहोलिक पेये पिऊ नयेत. त्याचा प्रकृतीवर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे पचनक्रियेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्याशिवाय शरीरात विषारी पदार्थ जमा होण्याची शक्यता वाढते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी झाली दूर…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : दिवाळी म्हटले की खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी आणि नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

5 दिवस ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

5 दिवस ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

5 दिवस ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

5 दिवस ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

5 दिवस ago