महाराष्ट्र

बीडमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या माजी तालुकाप्रमुखाचा मृत्यू; चार महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला

शिवाजीराव शिंदे यांच्या मृत्यूने राजकीय वर्तुळात खळबळ; आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट, पोलिसांचा तपास सुरू

बीड : बीड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी तालुकाप्रमुख शिवाजीराव शिंदे यांचा राहत्या घरी मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनेची माहिती मिळताच बीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

चार महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला

शिवाजीराव शिंदे यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर मे २०२६ मध्ये त्यांच्यावर झालेला प्राणघातक हल्लाही पुन्हा चर्चेत आला आहे. परळी शहरातील त्यांच्या मालकीच्या हॉटेलमध्ये असताना एका अज्ञात युवकाने त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात शिंदे यांच्या हात-पायांवर गंभीर वार झाले होते.

हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत हल्लेखोराला पकडल्याने शिंदे यांचा जीव वाचला होता. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे यांनी ‘सुरवसे’ नावाच्या युवकाने कौटुंबिक वादातून हा हल्ला केल्याचा आरोप केला होता. तसेच हॉटेलमधील रोख रक्कम लुटल्याचाही दावा त्यांनी केला होता.

जुन्या हल्ल्याचा मृत्यूशी संबंध आहे का? तपासातून स्पष्ट होणार

मे महिन्यातील हल्ल्यानंतर काही महिन्यांतच शिवाजीराव शिंदे यांचा मृत्यू झाल्याने या दोन्ही घटनांचा काही संबंध आहे का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, यासंदर्भात सध्या कोणताही निष्कर्ष काढता येणार नसून, पोलिसांच्या तपासातूनच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

शिवाजीराव शिंदे यांच्या मृत्यूमुळे बीडच्या राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. मृत्यूमागील नेमके कारण आणि संबंधित घटनाक्रम तपासाअंती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वाघोलीत अनैतिक संबंधांच्या संशयातून रिक्षाचालकाची निघृणपणे हत्या…

पुणे : वाघोलीत अनैतिक संबंधांच्या संशयातून एका रिक्षाचालकाची निघृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली…

45 मिनिटे ago

शिक्रापूर! हॉटेलमध्ये काम करताना अचानक घाम आला अन् काही वेळातच…

शिरूर : शिक्रापूर परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या युवकाचा मृत्यू झाल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली…

2 तास ago

फणसासह कधीही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन; नाहीतर उद्भवतील अनेक समस्या

फणस फक्त खाण्यासाठीच चविष्ट नाही, तर आरोग्यासाठीही तो खूप फायदेशीर आहे. त्यात फायबर, जीवनसत्त्वे व…

3 तास ago

मध हे पंचामृतातील एक अमृत

दूध, दही, तूप, मध, गूळ या पाच वस्तूंपासून बनते ते पंचामृत. या पाचही वस्तूला आपल्या…

3 तास ago

‘मी मराठवाड्याची लेक; तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही’; सुनेत्रा पवार

शेतशिवाराची पाहणी; बळीराजाच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या अडचणी नांदेड: 'मी मराठवाड्याची लेक आहे'... या मातीतल्या…

3 तास ago

कमी खाऊनही वाढतंय तुमचं वजन, या 5 सवयी ठरु शकतील जबाबदार

सध्या सर्वांना भेडसवणार एकच प्रश्न म्हणजे वजन कमीच होत नाही. अनेक जण वजन कमी करण्यासाठी…

16 तास ago