आरोग्य

या ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची चुक अजिबात करू नका

आपल्यापैकी बहुतेक जण एकाच वेळी भाज्या खरेदी करतात, जेणेकरून पुन्हा बाजारात जाण्याची गरज भासणार नाही. घरी आणलेल्या या भाज्या फ्रेश राहण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवतात. फ्रिजमध्ये ठेवलेल्या भाज्या लवकर खराब होत नाहीत आणि जास्त काळ ताज्या राहतात. पण तुम्हाला माहिती आहे का की काही भाज्या फ्रिजमध्ये ठेवून नंतर खाल्ल्याने आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो.

काही भाज्या अशा आहेत, ज्या फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यांची चव खराब होते आणि त्यातील पोषक घटक कमी होतात, पण त्या खाल्ल्याने आरोग्याचंही गंभीर नुकसान होऊ शकते. कॅन्सरचा धोका देखील वाढू शकतो असं म्हटलं आहे.

लसूण

लसूण फ्रिजमध्ये ठेवू नये. कारण त्याची चवही खराब होते आणि त्याचे औषधी गुणधर्म कमी होतात. कधीही सोललेली लसूण खरेदी करू नका आणि ती फ्रीजमध्येही ठेवू नका. असं केल्याने, लसूणला लवकर बुरशी लागू शकते, ज्यामुळे कॅन्सर देखील होऊ शकतो.

कांदे

कांदे फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यातील स्टार्च साखरेत बदलतात, ज्यामुळे कांदे जास्त गोड होतात आणि लवकर कुजू लागतात. अर्धा कापलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवू नका असा सल्ला देण्यात आला आहे. कापलेला असल्यास कांदा वातावरणातील बॅक्टेरिया शोषून घेऊ लागतो, जो खाल्ल्यामुळे नुकसान होऊ शकतं.

बटाटे

बटाटे फ्रीजमध्ये ठेवू नका. बटाट्यांना थंड तापमानात (८ अंश सेल्सिअसपेक्षा कमी) ठेवल्यास, त्यात असलेले स्टार्च साखरेत बदलतात. जेव्हा असे बटाटे तळले जातात किंवा बेक केले जातात तेव्हा ते एक्रिलामाइड नावाचा हानिकारक पदार्थ बाहेर सोडतात, ज्यामुळे कॅन्सरचा धोका देखील वाढू शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

15 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

19 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

19 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

19 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

19 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

20 तास ago