लहानपणी जेव्हा आई आपली काळजी घ्यायची तेव्हा ना केस गळायचे ना वजन वाढायचं. काही तरी जादू आहे, आईच्या उपायांमध्ये ज्यांमुळे लहानपण अगदी सुदृढ गेले. नंतर हळूहळू तारुण्यात आईचे ते उपाय नको वाटायला लागले. बाजारात मिळणाऱ्या अनैसर्गिक अशा गोष्टी चांगल्या वाटायला लागल्या. आता अनेकविध समस्यांना सामोरं जावं लागतंय. आईच्या उपायांपैकी एक होता, नाभिला तेलाने मालीश करणे. झोपताना आई साध्या खोबरेल तेलाचे काही थेंब आपल्या नाभीत टाकायची. आणि आपल्याला छान झोप लागायची.
नाभी शरीराचा असा भाग आहे जो विविध शरीर संस्थांशी जोडलेला असतो. तो थोडा पातळ असा अवयव आहे. त्यामुळे तेल शरीरात पटकन मुरते.
1) नाभीत तेल लावल्याने पचन व्यवस्था सुरळीत चालते. पोटात अडकलेला गॅस निघून जातो. तसेच जर पोट साफ होत नसेल तर, पोटही साफ होते. पोट फुगण्याचा त्रास असेल तर तो ही नाहीसा होतो.
2) शरीराला जर कोरड पडत असेल. तर ती पडणं बंद होते. नाभीतील तेल पटकन शरीरात जिरते. त्वचा आतून चांगली ठेवण्याचे काम करते.
3) शरीरातील मज्जातंतुंसाठी ही क्रिया फार फायदेशीर ठरते. तेलामुळे ते चांगले राहतात. तसेच संतुलित राहतात.
4) नाभीत तेल घातल्याने मानसिक शांतता मिळते. मनातील नको ते विचार नाहीसे होतात. त्यामुळे झोपताना नाभीला तेल लावायचे. झोपही छान व शांत लागते. शरीराचाही दिवसभराचा थकवा नाहीसा होतो. डोकं व शरीर शांत होते.
5) पोट दुखत असेल तर पोटाला तेल लावा. नाभीला तेलाने मालीश करा. त्यामुळे पोटाचे दुखणेही काही वेळात कमी होते.
6) बेलीफॅट्स कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. ओटीपोटाला आलेला फुगवटा नाहीसा होतो.
नाभीला मालीश करण्यासाठी खोबरेल तेल वापरू शकता. तसेच बदामाचे तेल बाजारात मिळते. त्याने मालीश केल्याने आराम मिळतो. ऑलिव्ह ऑइलचाही वापर करु शकता. वजन कमी करण्यासाठी ऑलिव्ह ऑइलचा जास्त फायदा होतो.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…