आरोग्य

जिमला जायला वेळ नाही? बेली फॅट कमी करण्यासाठी फॉलो करा या सोप्या गोष्टी

पोटावर वाढलेली चरबी आपला पूर्ण लूक खराब करू शकते. हट्टी बेली फॅट कमी करण्यासाठी बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात. ज्यात मुख्यत्वे जिमला जाण्याचा सल्ला दिला जातो. पण अनेक वेळा व्यायाम करणे, वॉकला जाणे, जिम करणे शक्य होत नाही. तुम्हाला सुद्धा तुमच्या व्यस्त वेळापत्रकामुळे जिमला जाण्यासाठी वेळ मिळत नसेल तर काळजी करू नका. तुम्ही जिमला न जाता सुद्धा काही गोष्टी फॉलो करून हट्टी बेली फॅट कमी करू शकता. पोटाची चरबी कमी करण्यासाठी कोणत्या गोष्टी फॉलो कराव्या, जाणून घ्या

साखर कमी करा बेली फॅट कमी करण्यासाठी साखरचे सेवन पूर्णपणे बंद करा. साखर असलेले पेय घेण्याऐवजी शुगर फ्री चहा किंवा ब्लॅक कॉफी फायद्याचे ठरू शकते. पॅकेट फूड घेताना त्यातील अडेड शुगर तपासूनच पदार्थाचे सेवन करा. शुगर क्रेव्हिंग कमी करण्यासाठी फळे खा. आहारातून साखर बाहेर काढल्याने फॅट कमी होण्यास मदत होऊ शकते.

प्रोटीन आणि फायबर खा पोटाची चरबी कमी करण्यासाठी प्रोटीन आणि फायबर असलेले डाएट महत्त्वपूर्ण म्हटले जाते. या दोन्ही पोषक घटकांमुळे पोट बराच वेळ भरलेले असल्याचे जाणवते. शिवाय हे पचनास देखील मदत करतात. यामुळे वजन कमी करताना मसल लॉस होत नाही आणि अनहेल्दी खाण्याची क्रेव्हिंग सुद्धा होत नाही. त्यामुळे बेली फॅट कमी करण्यासाठी आपल्या आहारात योग्य प्रमाणात प्रोटीन आणि फायबरचा समावेश करा.

भरपूर पाणी प्या केवळ हायड्रेशनसाठी नाही तर बेली फॅट कमी करण्यासाठी देखील भरपूर पाणी पिणे खूप आवश्यक आहे. यामुळे शरीराची चरबी तर कमी होतेच शिवाय पोटाचे आरोग्य देखील चांगले राहते. रोज कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे.

नीट झोप घ्या स्ट्रेसमुळे आपल्या पोटाची चरबी वाढू शकते. झोप पूर्ण झाली नाही तर कार्टिसोल हार्मोन ट्रिगर होऊ शकते, ज्यामुळे वेट लॉस करणे कठीण होऊ शकते. त्यामुळे झोप पूर्ण होईल याची काळजी घ्या.

(सोशल मीडियावरून साभार)

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संतुलित आरोग्यासाठी मेडिटेशन करण्याचे फायदे

आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी अनेकदा डॉक्टर मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात. मेडिटेशन हे केवळ मानसिक नव्हे तर…

2 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी शिवसेनेचा मदतीचा हात; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा…

3 तास ago

‘व्होट चोरी’च्या आरोपांवर संजय निरुपमांचा पलटवार; ‘पराभवानंतर निवडणूक आयोगाला लक्ष्य करणे योग्य नाही’

मुंबई: निवडणूक आयोग आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना…

3 तास ago

‘निवडणूक आयोगाच्या कामकाजाची सखोल चौकशी करा’; पृथ्वीराज चव्हाण

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.…

4 तास ago

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

1 दिवस ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

1 दिवस ago