आरोग्य

संतुलित आरोग्यासाठी मेडिटेशन करण्याचे फायदे

आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी अनेकदा डॉक्टर मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात. मेडिटेशन हे केवळ मानसिक नव्हे तर शारिरीक आरोग्यासाठीही उत्तम आहे. मेडिटेशनचे अनेक फायदे आहेत ज्यांचा आपल्या दैनंदिन जीवनावर खोलवर परिणाम होतो. अनेकदा मेडिटेशन कसे करावे, हे कळत नाही त्यामुळे अनेकदा मेडिटेशन करुन फायदा होत नाही. चला तर जाणून घेऊया मेडिटेशन करण्यापूर्वी काय आणि कशी तयारी करावी.

मेडिटेशन का करावे

अनेकदा आयुष्यात असे कटू प्रसंग येतात ज्यामुळे भावनांचा कल्लोळ होतो. अशावेळी आपण वर्तमानकाळातील आपलं अस्तित्व विसरुन जातो. ही घटना माझ्या सोबतच का घडली? याचा आपण सतत विचार करतो आणि मानसिक आरोग्य खालावून बसतो. अशा वेळी या प्रसंगातून बाहेर कसे पडायचे अन् असे पुन्हा आपल्या बाबतीत घडू नये यासाठी आपण काय करायला हवे? याचा विचार करणे गरजेचे असते. त्यापूर्वी या तणावातून बाहेर पडणे गरजेचे असते. त्यासाठी मेडिटेशन हा उत्तम मार्ग आहे.

मेडिटेशनचे फायदे

1) मेडिटेशन मुळे आपले मन आणि मेंदू सशक्त होते, त्यामुळे आपल्यापुढे कोणतेही संकट किंवा समस्या निर्माण झाली, तरी आपण प्रसन्न राहू शकतो.

2) नियमित मेडिटेशन मुळे आपल्या मनामध्ये एक आंतरिक ऊर्जा निर्माण होते, या ऊर्जेमुळेच आपण अनेक संकटांचा व समस्यांचा प्रभावीपणे सामना करू शकतो.

3) सततच्या मेडिटेशनमुळे आपली भावनिक लवचिकता वाढण्यास मदत होते. तसेच, मेडिटेशन हा मनाला ताण-तणाव मुक्त कारण्याचा महत्त्वाचा उपाय आहे.

मेडिटेशन साठी कोणती तयारी करावी

1) मेडिटेशनसाठी शांत परिसर असलेली जागा निवडावी, जेणेकरून शांत ठिकाणी मेडिटेशन करताना कोणताही अडथळा न येता पूर्ण लक्ष केंद्रित करता येईल.

2) मेडिटेशनचा सराव नियमित करावा, सातत्याने मेडिटेशन करणे उत्तम. नियमित मेडिटेशन केल्याने आपल्यावर होणाऱ्या सकारात्मक परिणामांचे मूल्यमापन करता येणे शक्य होते.

3) मेडिटेशन करण्याआधी थोडा हलका शारीरिक व्यायाम करणे गरजेचे आहे. शारीरिक व्यायामामुळे स्नायू मोकळे होण्यास मदत होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

झी मराठीच्या मालिकांमध्ये रंगणार भावनिक घडामोडींचा आठवडा; गुरुकुलवर वाडेकरांचा डाव, आनंदीचा परदेशवारीचा निर्णय!

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांमध्ये या आठवड्यात अनेक रंजक, भावनिक आणि नाट्यमय घडामोडी…

48 मिनिटे ago

जिल्हा न्यायालयांतील ३४ हजार कर्मचारी संपावर; न्याय देणाऱ्या व्यवस्थेतच न्यायाचा प्रश्न!

महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयांमधील तब्बल ३४ हजार कर्मचारी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी संपावर जाण्याची वेळ येणे, ही…

1 तास ago

जलद गतीच्या व्यायामांमुळे रक्तातील साखर वाढू शकते?

चालणे, योगासन करणे आणि जास्त हालचालींचे बहुतेक प्रकार शरीराला ग्लुकोजचे चांगले नियमन करण्यास मदत करतात.…

3 तास ago

घरच्या घरी ब्लड प्रेशर कसे तपासावे

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे आणि आहाराकडे दुर्लक्ष करतो, त्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या वाढताना दिसत…

3 तास ago

मनात विचारांचं काहूर, सतत चिडचिड होते? तुम्हालाही स्ट्रेस छळतोय ना, वाचा ४ सोपे उपाय

आपले मन आणि शरीर निरोगी असणं फार गरजेचे आहे. शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य जपायला हवे.…

16 तास ago

पाणी पिण्याची योग्य पद्धत

पाणी हे संपूर्ण आहारातील अतिशय महत्त्वाचा घटक असतो. शरीराचा ७० टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला…

16 तास ago