आरोग्य

या ब्लड ग्रुपच्या लोकांना असतो ब्रेन स्ट्रोकचा अधिक धोका

ब्रेन स्ट्रोक ही एक गंभीर आणि जीवघेणी समस्या आहे. मात्र, तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, एका खासप्रकारचा ब्लड ग्रुप असलेल्या लोकांना ब्रेन स्ट्रोकचा धोका अधिक राहतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून हा खुलासा झाला आहे. यूनिव्हर्सिटी ऑफ मेरीलॅंड स्कूल ऑफ मेडिसीन (UMSOM) च्या अभ्यासकांनी हा रिसर्च केला. याचा रिपोर्ट न्यूरोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलाय. रिसर्चनुसार, काही खास ब्लड ग्रुपच्या लोाकांना लवकर स्ट्रोक येण्याचा धोका असतो. म्हणजे ६० वयाच्या आधीच स्ट्रोक येऊ शकतो.

A ब्लड ग्रुपच्या लोकांना स्ट्रोकचा अधिक धोका

रिसर्चमध्ये आढळून आलं की, इतर ब्लड ग्रुपच्या लोकांच्या तुलनेत A ब्लड ग्रुप असलेल्या लोकांना वेळेआधीच स्ट्रोक येण्याचा धोका १६ टक्के अधिक असतो. दुसरीकडे असं गरजेचंही नाही की, A ब्लड ग्रुप असलेल्या लोकांना स्ट्रोल येईलच. मात्र, रिसर्चमधून हे दिसतं की, स्ट्रोकचा सामना करणाऱ्यांमध्ये सगळ्यात जास्त याच ब्लड ग्रुपचे लोक होते.

सगळ्यात सुरक्षित कोण

सगळ्यात प्रचलित ब्लड ग्रुप O च्या लोकांना याचा सगळ्यात कमी धोका असतो. या ब्लड ग्रुपच्या लोकांमध्ये इतर ब्लड ग्रुपच्या तुलनेत वेळेआधी स्ट्रोकचा धोका १२ टक्के कमी असतो.

ब्‍लड ग्रुप A असलेल्यांना सल्ला

ब्‍लड ग्रुप A असलेल्या लोकांना स्ट्रोक धोका जास्त आहे. मात्र, अभ्यासकांनी या गोष्टीवर जोर दिला की, हा फार जास्त नाहीये. ज्याचा ब्लड ग्रुप A आहे, त्यांनी घाबरू नये किंवा असाही विचार करू नये की, त्यांना स्ट्रोक येईलच. त्याऐवजी लोकांनी संभावित धोक्याबाबत सजग असलं पाहिजे. यापासून बचाव करण्यावर फोकस केला पाहिजे. जसे की, हेल्दी लाइफस्टाईल, कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशरवर लक्ष ठेवलं पाहिजे.

(सोशल मिडीयावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

37 मिनिटे ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

45 मिनिटे ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

6 तास ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

10 तास ago

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

1 दिवस ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

1 दिवस ago