आरोग्य

जेवण करताना पाणी प्यायल्याने पचनक्रियेवर कसा होतो परिणाम

पचनाशी संबंधित अनेक समज आणि गैरसमज खूप लवकर पसरतात. असाच एक समज आहे की, जेवणाबरोबर किंवा त्यानंतर पाणी प्यायल्याने पोटातील ॲसिड खूप पातळ होते, ज्यामुळे अन्न पचण्यास अवघड जाते आणि आपली पचनक्रिया बिघडते; याशिवाय पोटाच्या इतर समस्यासुद्धा वाढतात.

खरंतर पोटातील ॲसिडचे काम हे पाण्याच्या सेवनाकडे दुर्लक्ष करून पचनाचे कार्य सुरळीत पार पाडणे आहे. शरीरात हायड्रेशनची (पाण्याची) योग्य मात्रा राखण्यासाठी पाणी पिणे आवश्यक आहे आणि पाणी हे पचनास अडथळा आणण्याऐवजी उलट मदत करू शकते.

पोटात गॅस्ट्रिक ॲसिड तयार होते. विशेषत: हायड्रोक्लोरिक ॲसिड तयार होते, जे अन्न पचवण्यास, पचन क्रियेस फायदेशीर असलेले एन्झाइम सक्रिय करण्यास आणि पोटातील हानिकारक बॅक्टेरिया मारण्यास महत्त्वाची भूमिका बजावते. पोटातील आतील भाग हा अत्यंत ॲसिडिक असतो, ज्याचा पीएच सहसा १.५ ते ३.५ पर्यंत असतो, जो पचनासाठी अत्यंत आवश्यक आहे.

पोटातील ॲसिड आणि पाणी: पोट हा आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग आहे, जो आपण खाल्लेले अन्न आणि द्रव सामावून घेतो. जेव्हा तुम्ही एखादा पदार्थ खाता किंवा द्रव पिता, तेव्हा ते पदार्थ किंवा द्रव सामावून घेण्यासाठी पोटाचा आकार वाढतो. पण, जेव्हा तुम्ही पाणी पिता तेव्हा पोटामध्ये गेलेले पाणी द्रव व पदार्थ एकजीव करते. पोटाकडे ॲसिडिक वातावरण राखण्याची उत्तम क्षमता आहे. अन्न हे पोटाला खूप जास्त गॅस्ट्रिक ॲसिड तयार करण्यास प्रोत्साहन देते, ज्यामुळे पचनासाठी गरजेचे पीएच तयार करण्यास मदत होते. पाणी प्यायल्याने पोटातील पदार्थांचा आकार थोड्या वेळासाठी वाढू शकतो, पण गॅस्ट्रिक ॲसिड शरीराच्या सर्व गरजा पूर्ण करते आणि पचनक्रिया सुरळीत ठेवते.

पचनक्रियेसाठी पाणी कसे फायदेशीर आहे

संपूर्ण आरोग्यासाठी हायड्रेशन ही अत्यंत आवश्यक बाब आहे. जेवण करण्यापूर्वी, दरम्यान आणि त्या नंतर पाणी पिणे अनेक प्रकारे अन्न पचनास मदत करू शकते. पाणी पोषक तत्वांचे विघटन करण्यास मदत करते आणि पोटातील एन्झाइमॅटिक प्रक्रियेस प्रोत्साहन देते. पाण्यामुळे पचनसंस्थेचे कार्य सुरळीत राहण्यास मदत होते, तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. पचनक्रियेनंतर संपूर्ण शरीरात पोषक द्रव्ये वाहून नेण्यास पाणी मदत करते.

जेवणाबरोबर पाणी पिण्याचे काय फायदे आहेत

जेवणाबरोबर पाणी प्यायल्याने अन्न मऊ होते, जे पचायला सोपे जाते तसेच पाणी तुम्हाला पोट भरण्यास मदत करू शकते; ज्यामुळे तुम्ही खूप जास्त खाणे टाळू शकता आणि वजन नियंत्रणात ठेवू शकता. याशिवाय जेवणाबरोबर पाणी प्यायल्याने टाळू (Palate) स्वच्छ राहते, ज्यामुळे तुम्ही खात असलेल्या पदार्थाची चव वाढते आणि तुम्ही जेवणाचा अधिक चांगला आनंद घेऊ शकता.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

2 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

2 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

3 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

3 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

8 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

9 तास ago