आरोग्य

फ्लू’च्या साथीमध्ये ‘असं’ करा मुलांच्या आरोग्याचे संरक्षण

रोगप्रतिकारशक्तीला सर्वाधिक प्राधान्य द्या

एक दणकण रोगप्रतिकारशक्ती म्हणजे ‘फ्लू’चा आजार रोखण्याच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल. फळे, भाज्या, अखंड धान्ये आणि निव्वळ प्रथिनांसारख्या अन्नपदार्थांनी समृद्ध आहारातून भरपूर रोगप्रतिकारशक्ती मिळणारे घटक मिळतात. शरीराच्या कठोर संरक्षण यंत्रणेची इमारत याच घटकांच्या मदतीने उभारली जाते. झोपण्याची नियमित वेळ निश्चित करणेही तितकेच महत्त्वाचे आहे, कारण झोपेच्या अभावामुळेही रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते व मुलांना सर्दी आणि ‘फ्लू’सारखे आजार होण्याचा धोका वाढतो.

‘अ’ जीवनसत्वाची रेलचेल असलेले पदार्थ खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्तीचे कार्य व्यवस्थित पार पाडले जाण्यास मदत होते. अ जीवनसत्वाचे काही उत्तम स्त्रोत आहेत, ज्यांचा समावेश रोजच्या आहारात असायला हवा. अ जीवनसत्वाने समृद्ध अशा या पदार्थांमध्ये गाजर, रताळी आणि लाल ढोबळी मिरची यांसारख्या भाज्यांचा तसेच कॅटालोप, अॅप्रिकॉट आणि आंबा यांसारख्या फळांचा समावेश होतो. विशिष्ट प्रकारचे मासे आणि दुग्धजन्य पदार्थ यांतही अ जीवनसत्व असते.

‘क’ जीवनसत्व हे रोगप्रतिकारशक्तीला अधिक प्रभावी बनविणारे जीवनसत्व म्हणून प्रसिद्ध आहे. संत्री आणि ग्रेपप्रुट्ससारखी लिंबूवर्गीय फळे तसेच स्ट्रॉबेरीज, किवी, टोमॅटो तसेच ब्रोकोली, पालक आणि केल सारख्या भाज्यांमध्ये या अत्यावश्यक पोषक घटकाची रेलचेल असते.

‘ई’ जीवनसत्व हे एक शक्तीशाली अँटिऑक्सिडंट आहे, जे भक्कम रोगप्रतिकारशक्ती घडविण्यास पाठबळ देते. बदाम, हेझलनट आणि शेंगदाणे यांसारखी नट्स, तूप आणि तेले, त्याचप्रमाणे सूर्यफुलाच्या बिया, गव्हाचे सत्व आणि ब्रेकफास्ट सीरील्स व फळांच्या रसांसारखे फोर्टिफाइड पदार्थ हे ई जीवनसत्त्वाचे उत्तम स्त्रोत आहेत.

आपल्या मुलांच्या आहारात फळे व भाज्यांचा पुरेशा प्रमाणात समावेश करणे तुम्हाला शक्य नसेल तर त्यांच्या दुधाच्या ग्लासामध्ये PediaSure टाकून पहा, जेणेकरून त्यांच्या शरीराची पोषणाची गरज पूर्ण होईल. यामुळे दूध चवदार बनेलच पण त्याचबरोबर त्या दुधाच्या ग्लासाचे पोषणमूल्यही वाढेल. हे एक संपूर्ण आणि संतुलित पोषण आहे, ज्यात वैज्ञानिक चाचण्या पार केलेली ३७ पोषक तत्वे आहेत, ज्यामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.

२) व्यायामाला प्रोत्साहन द्या

शारीरिक व्यायामामुळे चांगली रोगप्रतिकारशक्ती, अधिक चांगली झोप आणि अभ्यासात अधिक चांगले लक्ष लागणे असे अनेक फायदे मुलांना मिळतात. आपल्या मुलांना व्यायाम करण्यासाठी आणि उत्साहाने खेळण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना व्यायामाच्या ऑनलाइन वर्गांमध्ये टाका किंवा समवयीन मुलांसोबत प्ले डेट्स ठरवून द्या.

३) मनावरचा ताण दूर करा आणि नवीन उपक्रम हाती घ्या

मनावर ताण असेल तर रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. झोपताना तुमच्या मुलाला एखादी छानशी गोष्ट, एखादे पॉडकास्ट ऐकवा किंवा एकत्र एखादा पदार्थ बनविण्यासारखे काहीतरी काम करा म्हणजे त्यांच्या मनावरील ताण हलका होईल. यामुळे तुमच्यातील नातेही घट्ट होईल आणि त्यांच्याकडून अधिक सकस अन्नही खाल्ले जाईल. आपल्या मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल असे काही पदार्थ आपणहून बनविण्यास प्रोत्साहन द्या. जसे की योगर्टमध्ये आणि क जीवनसत्वाने समृद्ध स्ट्रॉबेरीज टाकणे किंवा ई-जीवनसत्त्वाची रेलचेल असलेले पीनट बटर क्रॅकर्सवर लावणे. थोड्या मोठ्या मुलांना स्क्रॅम्बल्ड एग्ज किंवा फ्रेंच टोस्टसारखे प्रथिनांनी समृद्ध नाश्त्याचे पदार्थ बनविताना सोबत घ्या किंवा जेवणासाठी सलाड किंवा त्यांची आवडती भाजी तयार करताना त्यांची मदत घ्या.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

7 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago