आरोग्य

बदाम आणि मध एकत्र खाल्ल्यानं काय होतं वाचाल तर रोज खाल

बदामामध्ये भरपूर पोषक तत्व असतात. यात एनर्जी फॅट, फायबर, प्रोटीन, पोटॅशिअम, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, व्हिटॅमिन ई, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड आणि आयर्न इतके पोषक तत्व असतात. जे शरीराला भरपूर फायदे देतात. सामान्यपणे जास्तीत जास्त लोक रात्री भिजवून ठेवलेले बदाम सकाळी खातात. मात्र, अनेकांना हे माहीत नाही की, बदाम मधासोबत खाल्ले तरी शरीराला अनेक फायदे मिळतात. या फायद्यांबाबत आज जाणून घेणार आहोत.

मधासोबत बदाम खाण्याचे फायदे

मधासोबत बदाम खाल्ल्यानं पचन तंत्र मजबूत राहतं. बदाम आणि मध सोबत खाल्ल्यास केस आणि त्वचेची चमक अधिक वाढते.

बदाम आणि मधाचं मिश्रणानं हाडं मजबूत होतात. कारण मधात व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असतं. तर बदामात कॅल्शिअम असतं.

बदामामध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड आणि अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. हे हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतात. मधातील अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स तत्वामुळे हृदाय निरोगी राहतं.

बदामातील व्हिटॅमिन सी आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्सनं शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ज्यामुळे वेगवेगळे इन्फेक्शन आणि आजारांचा धोका कमी होतो.

बदाम आणि मधात फायबर व अ‍ॅंटी-डायबेटिक गुण असतात. ज्यामुळे डायबिटीस कंट्रोल करण्यास मदत मिळते.

उन्हाळ्यात बदाम कसे खावेत

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बदाम भिजवून खाणं चांगलं ठरतं. बदाम रात्रभर किंवा काही तासांसाठी पाण्यात भिजवून ठेवा. याने साल काढणंही सोपं होतं. तसेच बदाम भिजवून खाल्ले तर त्यातील पोषक तत्व मिळतात. तसेच भिजवलेले बदाम पचवणं सुद्धा सोपं होतं. कच्चे बदाम खाल तर पचन तंत्रासाठी समस्या होऊ शकते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

23 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

23 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

23 तास ago