टोमॅटो ही एक अशी भाजी आहे जी अनेक खाद्यपदार्थांची चव वाढवतं. टोमॅटोचं महत्त्व आता इतकं वाढलं आहे की, जेव्हा ते महाग झाले तेव्हा लोकांच्या पदार्थांची चव बिघडू शकते. काही लोकांना तो नुसताही खायला आवडतो.
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, फॉस्फरस, कॅल्शियम आणि पोटॅशियमसारखे महत्त्वाचे पोषक घटक आहेत जे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. भारतातील लोकप्रिय न्यूट्रीशनिस्ट निखिल वत्स यांनी झी न्यूजला याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
जास्त टोमॅटो खाण्याचे तोटे
कोणत्याही आरोग्यदायी गोष्टीचे फायदे आणि तोटे दोन्ही असू शकतात, त्यामुळेच एका मर्यादेपेक्षा जास्त पौष्टिक अन्नही न खाण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. टोमॅटोचा गुणधर्म एसिडिक असतो आणि त्यात सोलेनाईन आणि लायकोपीन देखील असतं, ज्याचं प्रमाण वाढल्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. जास्त टोमॅटो खाण्याचे तोटे काय आहेत हे जाणून घेऊया.
सांधेदुखी
टोमॅटोच्या अतिसेवनाने सांधेदुखी होऊ शकते, कारण यामध्ये सोलेनाईन नावाचा अल्कलॉइड असतो, ज्यामुळे सांध्यामध्ये वेदना आणि सूज येऊ शकते. त्यामुळे सांधेदुखीसारख्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांनी टोमॅटो कमी प्रमाणात खावे.
एसिडिटी
टोमॅटो ही पचनासाठी उत्कृष्ट भाजी मानली जाते, परंतु जर तुम्ही ते एका मर्यादेपेक्षा जास्त खाल्लेत तर तुम्हाला ॲसिडिटी किंवा ॲसिड रिफ्लक्सचा त्रास होऊ शकतो. टोमॅटोचं स्वरूप एसिडिक आहे ज्यामुळे गॅस्ट्रोइसोफेजल रिफ्लक्सची समस्या वाढू शकते.
किडनीचे आजार
जे लोक किडनीशी संबंधित आजारांनी त्रस्त आहेत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच टोमॅटो खावेत कारण तो पोटॅशियमचा रिच सोर्स मानला जातो, ज्यामुळे अनेक समस्या वाढू शकतात. अशा लोकांनी टोमॅटो सूप आणि टोमॅटो सॉस खाणं टाळलं पाहिजे.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…