आरोग्य

वाढलेल्या वजनाचे दुष्परिणाम

वाढलेले वजन ही आरोग्यविषयक मोठी समस्या आहे. याचा आपल्या शारीरिक आरोग्यावर तसेच मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. विविध आजार होण्याची शक्यता वाढते. सर्व वयाच्या व्यक्तींनी आपले वजन आटोक्यात ठेवणे कधीही चांगलेच आहे. वाढलेल्या वजनाचे काय काय परिणाम होऊ शकतात, हे आज आपण पाहू.

१) आधुनिक युगातील आजार लठ्ठ व्यक्तीला होण्याची शक्यता जास्त असते. वजन आणि शरीरातील चरबी वाढल्याने रक्तदाब, हृदयविकार, हदयाशी संबंधित समस्या, मधुमेह, ब्रेन स्ट्रोक या आजारांचा धोका वाढतो. पोटात चरबी वाढल्याने इन्शुलीनचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही. यातून टाईप २ मधुमेह होतो. शरीर आडवेतिडवे वाढले तर सर्व पेशींना रक्त पुरविण्यासाठी हदयाला किती काम करावे लागेल, विचार करा. यातून रक्तदाब, हृदयविकार होतात.

२) लठ्ठ व्यक्तीला खूप घाम येतो. यामुळे त्वचेचे विकार बळावू शकतात. पायांवर व घोट्यांभोवती सूज येते. त्यामुळे हालचाल करण्यास अडथळे निर्माण होतात. पाठ आणि कंबर दुखते.

३) चरबी फक्त त्वचेखाली वाढते असे नव्हे तर ती आतील इंद्रियांभोवतीदेखील वाढू शकते. उदा छाती व पोट यांच्यामधील पडद्यावर चरबी साठली तर फुप्फुसावर दाब पडून श्वसनास अडथळा येतो. थोड्याशा श्रमामुळेही धाप लागते. व्यायाम व हालचाली नको वाटतात. किडनीभोवती चरबी वाढली तर किडनीचे कार्य मंदावते. फॅटी लिव्हर समस्या निर्माण होते.

४) वाढलेल्या वजनाचा भार सांधे व गुडघ्यावर पडतो. वेगाने हालचाल करणे शक्य होत नाही. लठ्ठ व्यक्तीला हमखास गुडघेदुखी होते.

५) लठ्ठ स्त्रियांना गरोदरपणात आणि बाळंतपणात काही समस्या निर्माण होतात. ब्लडप्रेशर अचानक वाढू शकते. बाळाला धोका निर्माण होतो.

६) स्थूलतेमुळे इतरही काही समस्या निर्माण होतात. शारीरिक क्षमता कमी होतात. शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा कमी होते. याचा आनंद घेता येत नाही, मानसिक ताण वाढतो. त्यातून डिप्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते.

७) लठ्ठ व्यक्ती खूप घोरतात. याचा इतरांना त्रास होतो. झोपेत अचानक श्वास बंद पडू शकतो. याला स्लीप अपनिया असे म्हणतात. असे एखादा क्षणच होते, लगेच जाग येते. पण ती व्यक्ती घाबरून जाते. असे वारंवार होऊ शकते. यामुळे झोप व्यवस्थित होत नाही. सकाळी उठल्यावर कंटाळा येतो.

८) वजन वाढण्याचा मानसिक त्रासही होतो. जाड व्यक्तीला एक प्रकारचा कमीपणा, न्यूनगंड वाटतो. अशी व्यक्ती मग चेष्टेचा विषय बनते. मित्र, नातेवाईक टोमणे मारतात. वजन कमी कसे करावे याचे अनाहूत सल्ले सुरु होतात.

९) जाड व्यक्ती सुंदर असली तरी जाडीमुळे स्वत:ला कुरुप समजते. त्या व्यक्तीचा आत्मविश्वास, आत्मसन्मान कमी होतो. नकारात्मक विचार मनात येऊ लागतात. मनात एक प्रकारची भीती निर्माण होते. अशी व्यक्ती मग जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न, पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीच्या हातात चारचाकी; धडक बसल्याने एकाचा मृत्यू

शिक्रापुर (योगेश शेंडगे) सध्या पुण्यातील हिट अँड रण प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा असुन एका बड्या…

2 तास ago

बापरे! पुणे जिल्हाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; मतमोजणीपूर्वी बदली करा…

निवडणूक आयोगाला पत्र; प्रांताधिकाऱ्यांच्या आरोपाने जिल्हयात मोठी खळबळ! शिरूर (अरुणकुमार मोटे): पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे…

19 तास ago

शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरीकांचे प्रश्नचिन्ह लागले ऊमटू…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यासह बेट भागात गेल्या दोन वर्षापासून विद्युत रोहीत्र चोरीचे सत्र सातत्याने…

19 तास ago

कारेगाव येथे मोटार सायकलची तोडफोड करुन दहशत करणा-या सहा आरोपीना रांजणगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कारेगाव (तेजस फडके) कारेगाव येथे दि 27 मे 2024 रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास आय.टि.…

2 दिवस ago

Video; पारोडी गावातील आरोग्यवर्धीनी उपकेंद्राला कायमच टाळं ; रुग्णालय वारंवार बंद तर डॉक्टर सतत गैरहजर…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील पारोडी येथील सरकारी आरोग्य उपकेंद्र कायमच बंद अवस्थेत आढळून येत…

2 दिवस ago

शिरुर; वाळूमाफिया आणि माती चोरांसाठी हवेलीतील बड्या नेत्याचा महसूल व पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव…?

शिंदोडी (तेजस फडके) सध्या पुण्यातील हिट अँड रण प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा असुन एका बड्या…

2 दिवस ago