आरोग्य

स्किन अ‍ॅलर्जी नि घरगुती उपाय

स्किन अ‍ॅलर्जी ही आजकाल प्रत्येकासाठीच एक मोठी समस्या बनली आहे. कधी चुकीच्या आहारशैलीमुळे तर कधी कोणत्या चुकीच्या क्रीम, कॉस्मेटिक्समुळे त्वचेवर रॅशेज, मुरुम, खाज अशा समस्या उद्भवू लागतात. या समस्या बहुतांश वेळा शरीर व चेहऱ्यावर डाग देखील सोडून जातात. स्किन अ‍ॅलर्जी फुड अ‍ॅलर्जी पेक्षा खूप वेगळी आणि वेदनादायक असते. स्किन अ‍ॅलर्जी मध्ये शरीरावर लालसर चट्टे किंवा पुरळ येऊ लागतात. स्किन अ‍ॅलर्जी खास करून तेव्हा होते, जेव्हा आपली त्वचा कोणत्यातरी अशा गोष्टीच्या संपर्कात येते ज्यासाठी इम्युन सिस्टम त्याला रोखण्यासाठी अ‍ॅंटीबॉडीज रिलीज करते. बहुतांश वेळी ही अ‍ॅलर्जी सामान्य असते तर काही वेळेस गंभीर असते. तर काही अ‍ॅलर्जी या जुन्या असतात ज्या औषधा मार्फत दूर केल्या जाऊ शकतात.

बेकिंग सोडा: स्किन अ‍ॅलर्जी पासून मुक्ती मिळवण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. बेकिंग सोडा वापरताना थोडी काळजी घेण्याची आवश्यकता असते. बेकिंग सोडा त्वचेत पीएच संतुलन राखण्यास मदत करतो. त्वचेवर बेकिंग सोडा वापरण्यासाठी सर्वप्रथम एक चमचा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात थोडं पाणी मिक्स करा. आता याची पातळ व मऊ अशी पेस्ट बनवून अ‍ॅलर्जी झालेल्या जागेवर लावा. १० मिनिटा नंतर ही पेस्ट धुवा. अ‍ॅलर्जी पासून मुक्ती मिळवण्यासाठी दिवसातून ३ ते ४ वेळा तुम्ही याचा वापर करू शकता.

कोरफडीचा गर: जर अ‍ॅलर्जीमुळे शरीरावर खाज व त्वचा कोरडी पडण्याची समस्या उद्भवत असेल तर कोरफडीचा गर खाज व जळजळ अगदी सहज व झटपट रोखेल. सर्वप्रथम कोरफड घेऊन त्वचेवर लावा. जर कोरफडीचे झाड नसेल तर बाजारातून विकत आणून किंवा अ‍ॅलोवेरा जेलचा देखील वापर करू शकता. ३० ते ४० मिनिटे कोरफडीचा गर अ‍ॅलर्जी झालेल्या ठिकाणी लावून ठेवा. काहीच दिवसात खाज व जळजळीच्या समस्येपासून मुक्ती मिळेल.

खोबरेल किंवा नारळ तेल: खोबरेल तेलात मॉइस्चराइजिंग गुणधर्म असतात जे अ‍ॅलर्जी झालेल्या काळात त्वचेची रक्षा करतात. तसेच अ‍ॅलर्जीमुळे होणारी खाज देखील थांबवतं. एका वाटीत थोडं खोबरेल तेल घ्या आणि ५ सेकंदासाठी ते गरम करा. हे कोमट तेल अ‍ॅलर्जी झालेल्या जागी लावा, मालिश करू नका. १ तास तेल तसंच राहू द्या. या तेलाचा वापर ३ ते ४ तासांनी पुन्हा करू शकता.

अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर: अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर हे उत्तम स्किन केयर एजंट आहे. यामध्ये अ‍ॅसिटीक अ‍ॅसिड असतं, जे त्वचेवरील खाज व अ‍ॅलर्जी कमी करतं. पण नाजूक त्वचेवर याचा वापर करू नये. एक कप गरम पाण्यात एक टिस्पून अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर मिसळा. आता कापसाच्या बोळ्याने हे मिश्रण अ‍ॅलर्जी झालेल्या ठिकाणी लावा. आता हे सुकण्यासाठी ठेवा आणि काही वेळा नंतर थंड पाण्याने जागा धुवून घ्या. हा उपाय तुम्ही दिवसातून कमीत कमी २ वेळा करू शकता.

टी-ट्री ऑइल: टी-ट्री ऑइल मुरूमा पासून सुटका मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. स्किन अ‍ॅलर्जी मध्ये हे तेल लाभदायक ठरते. यामध्ये अ‍ॅंटीमायक्रोबियल आणि अ‍ॅंटी इन्फ्लमेट्री गुणधर्म असतात, जे कित्येक प्रकारच्या अ‍ॅलर्जी पासून सुटका मिळवून देण्यास मदत करतात. त्वचेवरील लाल चट्टे आणि खाज यासाठी या तेलाचा चांगला उपाय आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबईत हरवलेली चिमुरडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप परत

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…

11 तास ago

प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावर अ.भा.वि.प.चा संताप; जबाबदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…

11 तास ago

‘आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही’! होमगार्डचा आक्रोश; ४० हजार कुटुंबांचा जगण्याचा प्रश्न ऐरणीवर

मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…

11 तास ago

साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांच्या बदल्यांवर वाद; शिवसेनेची चौकशीची मागणी

मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…

11 तास ago

एसटी सौर ऊर्जेचा पहिला टप्पा सुरू; २.५७ मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पास मंजुरी

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…

11 तास ago

काँग्रेसचे ‘पुतना मावशीचे प्रेम’; महिलांच्या प्रश्नांवर दुटप्पी भूमिका; डॉ. नीलम गोऱ्हे

महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…

11 तास ago