मुख्य बातम्या

शिरुर; नागपुर स्थित मुख्यमंत्र्यासाठी भाजपा मध्ये आस्था तर पुणे स्थित उपमुख्यमंत्र्यासाठी राष्ट्रवादीत अनास्था

शिरुर (तेजस फडके) काल (दि २२) रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात कार्यकर्त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवले. शिरुर तालुक्यात भाजपाच्या रक्तदान शिबीर तर राष्ट्रवादीच्या वतीने आरोग्य शिबीर व वृक्षारोपण करण्यात आले.

परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शिरुर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या ज्या राजकीय पुढाऱ्यांना अजित पवारांनी वेगवेगळी पदे दिली. त्यांच्या गावात मात्र अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कोणतेही उपक्रम राबविण्यात आले नाही. त्यामुळे नागपुर स्थित मुख्यमंत्र्यासाठी शिरुर तालुक्यातील भाजपा मध्ये आस्था तर पुणे स्थित उपमुख्यमंत्र्यासाठी राष्ट्रवादीत अनास्था असेच काहीसे चित्र संपुर्ण शिरुर तालुक्यात पहायला मिळाले.

भाजपाच्या वतीने कोंढापुरी व शिरुर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तर राष्ट्रवादीच्या वतीने प्रत्येक जिल्हा परिषद गटात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य शिबीर घेण्यात आले. आमदार माऊली कटके यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी तालुक्यात वेगवेगळे उपक्रम राबवले.

परंतु शिरुर तालुक्यातील ज्या पदाधिकाऱ्यांना जिल्हा नियोजनच्या माध्यमातुन अजित पवारांनी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला. त्याचं पदाधिकाऱ्यांच्या गावात मात्र पवार यांच्या वाढदिवसाला साधं एक झाड लावण्यात आल नाही हि वस्तुस्थिती आहे. शिरुर तालुक्याच्या ४२ गावातही जवळपास हिच परिस्थिती आहे. त्यामुळे अजित पवार, पार्थ पवार यांच्या नावाचा वापर करुन लाखों, करोडो रुपये कमविणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांनी अजित पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी सामाजिक उपक्रम न राबवता फक्त बॅनरबाजी करत देखावा केला.

शिरुर तालुक्यातील पेट्रोल पंपात चोरी; चार कामगारांवर गुन्हा दाखल

शिरुरमध्ये पावामध्ये घुशीची लेंडी आढळल्याचे प्रकरण: अन्न सुरक्षा विभागाने पाहणी करत केली बेकरी सील 

मलठणच्या सावी ताठेचे राष्ट्रीय स्तरावर यश! सेबर तलवारबाजीमध्ये महाराष्ट्रासाठी ब्राँझ पदकाची कमाई

बेकरी सील करून चालणार नाही, बेकरी  चालक व स्वीट होमवर गुन्हा दाखल करा

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘सीएम-सृष्टी’ नव्हे, ही तर ‘सीएम-तुष्टी’! पेपरफुटीवर मौन, विद्यार्थ्यांवर दडपशाही; अमोल मातेले

‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई :…

4 तास ago

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

1 दिवस ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

2 दिवस ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

2 दिवस ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

2 दिवस ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

2 दिवस ago