स्किन अॅलर्जी ही आजकाल प्रत्येकासाठीच एक मोठी समस्या बनली आहे. कधी चुकीच्या आहारशैलीमुळे तर कधी कोणत्या चुकीच्या क्रीम, कॉस्मेटिक्समुळे त्वचेवर रॅशेज, मुरुम, खाज अशा समस्या उद्भवू लागतात. या समस्या बहुतांश वेळा शरीर व चेहऱ्यावर डाग देखील सोडून जातात. स्किन अॅलर्जी फुड अॅलर्जी पेक्षा खूप वेगळी आणि वेदनादायक असते. स्किन अॅलर्जी मध्ये शरीरावर लालसर चट्टे किंवा पुरळ येऊ लागतात. स्किन अॅलर्जी खास करून तेव्हा होते, जेव्हा आपली त्वचा कोणत्यातरी अशा गोष्टीच्या संपर्कात येते ज्यासाठी इम्युन सिस्टम त्याला रोखण्यासाठी अॅंटीबॉडीज रिलीज करते. बहुतांश वेळी ही अॅलर्जी सामान्य असते तर काही वेळेस गंभीर असते. तर काही अॅलर्जी या जुन्या असतात ज्या औषधा मार्फत दूर केल्या जाऊ शकतात.
बेकिंग सोडा: स्किन अॅलर्जी पासून मुक्ती मिळवण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. बेकिंग सोडा वापरताना थोडी काळजी घेण्याची आवश्यकता असते. बेकिंग सोडा त्वचेत पीएच संतुलन राखण्यास मदत करतो. त्वचेवर बेकिंग सोडा वापरण्यासाठी सर्वप्रथम एक चमचा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात थोडं पाणी मिक्स करा. आता याची पातळ व मऊ अशी पेस्ट बनवून अॅलर्जी झालेल्या जागेवर लावा. १० मिनिटा नंतर ही पेस्ट धुवा. अॅलर्जी पासून मुक्ती मिळवण्यासाठी दिवसातून ३ ते ४ वेळा तुम्ही याचा वापर करू शकता.
कोरफडीचा गर: जर अॅलर्जीमुळे शरीरावर खाज व त्वचा कोरडी पडण्याची समस्या उद्भवत असेल तर कोरफडीचा गर खाज व जळजळ अगदी सहज व झटपट रोखेल. सर्वप्रथम कोरफड घेऊन त्वचेवर लावा. जर कोरफडीचे झाड नसेल तर बाजारातून विकत आणून किंवा अॅलोवेरा जेलचा देखील वापर करू शकता. ३० ते ४० मिनिटे कोरफडीचा गर अॅलर्जी झालेल्या ठिकाणी लावून ठेवा. काहीच दिवसात खाज व जळजळीच्या समस्येपासून मुक्ती मिळेल.
खोबरेल किंवा नारळ तेल: खोबरेल तेलात मॉइस्चराइजिंग गुणधर्म असतात जे अॅलर्जी झालेल्या काळात त्वचेची रक्षा करतात. तसेच अॅलर्जीमुळे होणारी खाज देखील थांबवतं. एका वाटीत थोडं खोबरेल तेल घ्या आणि ५ सेकंदासाठी ते गरम करा. हे कोमट तेल अॅलर्जी झालेल्या जागी लावा, मालिश करू नका. १ तास तेल तसंच राहू द्या. या तेलाचा वापर ३ ते ४ तासांनी पुन्हा करू शकता.
अॅप्पल सायडर व्हिनेगर: अॅप्पल सायडर व्हिनेगर हे उत्तम स्किन केयर एजंट आहे. यामध्ये अॅसिटीक अॅसिड असतं, जे त्वचेवरील खाज व अॅलर्जी कमी करतं. पण नाजूक त्वचेवर याचा वापर करू नये. एक कप गरम पाण्यात एक टिस्पून अॅप्पल सायडर व्हिनेगर मिसळा. आता कापसाच्या बोळ्याने हे मिश्रण अॅलर्जी झालेल्या ठिकाणी लावा. आता हे सुकण्यासाठी ठेवा आणि काही वेळा नंतर थंड पाण्याने जागा धुवून घ्या. हा उपाय तुम्ही दिवसातून कमीत कमी २ वेळा करू शकता.
टी-ट्री ऑइल: टी-ट्री ऑइल मुरूमा पासून सुटका मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. स्किन अॅलर्जी मध्ये हे तेल लाभदायक ठरते. यामध्ये अॅंटीमायक्रोबियल आणि अॅंटी इन्फ्लमेट्री गुणधर्म असतात, जे कित्येक प्रकारच्या अॅलर्जी पासून सुटका मिळवून देण्यास मदत करतात. त्वचेवरील लाल चट्टे आणि खाज यासाठी या तेलाचा चांगला उपाय आहे.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील बदलांच्या मागणीसाठी झालेल्या देशव्यापी आंदोलनावरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय…
महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, लाडकी बहीण योजना आणि स्मार्ट मीटरवरून सरकारवर टीका; तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन…
1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे…
झोप पूर्ण न होणे आणि शांत झोप न लागणे यामुळे इन्सुलिन आणि कोर्टिसोल सारख्या हार्मोन्सचे…
ऑरिक, ग्रीनफील्ड रस्ता, विमानतळ विस्तार आणि रेल्वे दुहेरीकरणाच्या कामांना मिळणार वेग; नागरिकांच्या जमीन मोजणीची प्रतीक्षाही…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याविरोधात काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर…